Share

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना सामाजिक कार्यकर्ते संबोधून फडणवीसांनी अणाजी पंताचे वारसदार असल्याचे सिद्ध केले – वंचित आघाडी

Published On: 

🕒 1 min read

अकोला :  राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त नमन करताना देवेंद्र फडणवीसांनी छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख सामाजिक कार्यकर्ते म्हणून केला असून ह्या कृतीतून फडणवीसांनी ते अणाजी पंताचे वारसदार असल्याचे सिद्ध केले, अशी टिका वंचित बहूजन आघाडी चे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केली असून जाहीर माफी मागावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

गेली पाच वर्षे भाजपा पदाधिकारी ह्यांनी बहूजन महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीला जाणिवपूर्वक अवमानकारक अभिवादन करणा-या पोस्ट करायला सुरुवात केली आहे.त्याची पुनरावृत्ती आज देवेंद्र फडणवीस यांच्या स्मृतिदिनानिमित्त केलेल्या पोस्ट मधून झाली आहे. शाहू महाराजांना थोर समाजिक कार्यकर्ते असा केला होता.ह्यातून वेदोक्त व शास्त्रोक्त पध्दतीने शाहूमहाराजांचा द्वेष करणारी मानसिकता असलेल्या समुहाच्या गोटातील असल्याचे सिद्ध केले आहे.त्याकाळी शाहू महाराजांवर जीवघेणे हल्ले झाले, त्यांच्यावर गलिच्छ आरोप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारणारे, छत्रपती संभाजी राजे ह्यांना बदनाम करणारे अणाजी पंत यांचा वारसाच देवेंद्र फडणवीस चालवित असल्याचे आजच्या पोस्ट मधून सिद्ध झाले आहे.

१४ एप्रिल रोजी भाजपाच्या राष्ट्रपति व पंतप्रधान यांनी देखील डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांना जयंतीनिमित्त श्रध्दाजंली दिली होती.त्यानंतर परशुराम जयंती ला मात्र राष्ट्रपति व पंतप्रधान यांचे अकांउट वर अभिवादन करणा-या पोस्ट होत्या.बहूजन महापुरुषांच्या कर्तृत्वाचा अनादर व अवमान करण्यासाठी जाणीवपूर्वक अशा पोस्ट भाजपा नेते करीत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराज, संभाजी राजे व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही भेदाभेद मानला नाही.हिच मनुवाद्यांची पोटदुखी आहे.शाहू महाराजांच्या अवमानाची पोस्ट विरोधात संतापाची लहर उठल्याने फडणवीसांनी तासाभरात पोस्ट डिलीट करून नविन पोस्ट टाकली आहे.त्यांच्या या कृतीचा वंचित बहूजन आघाडी निषेध व्यक्त करीत असून महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही.ह्या करीता फडणवीसांनी तातडीने महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी अशी मागणी देखील राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!