Share

भिडे वाडयाला राष्ट्रीय स्मारक घोषित करून त्याठिकाणी शाळा सुरु करा

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडे वाडा येथे देशातील मुलींची पहिली शाळा सुरू केली होती . ही वास्तू सामाजिक, ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे; पण त्याचे अद्यापही योग्य प्रकारे जतन होत नसून,भिडे वाडा अगदी मोडकळीस आला आहे.बऱ्याच दिवसापासून या वाड्याचे पुनर्वसन व्हावे अशी मागणी होत होती. यावर आता कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख याची भेट घेतली आहे.

भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात यावे,अशी मागणी सातत्याने होत आहे. भिडे वाडा या वास्तूला राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करावं आणि तिथे पुन्हा शाळा सुरु करावी, या मागणीसाठी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली. यावेळी मंत्री विजय वडेट्टीवार हेही उपस्थित होते. हा विषय शासनाच्या अजेंड्यावर घेऊन याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचं आश्वासन अमित देशमुख यांनी दिल्याचं, रोहित पवार यांनी सांगितलं आहे.

त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून या वास्तूला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळेल आणि भिडे वाड्याचा विकास वेगाने होईल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला आहे.महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या सहकारी फातिमा शेख यांनी 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली होती. त्यामुळेच मुलींसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले होऊन त्या आज वेगवेगळ्या क्षेत्रांत भरारी घेत आहेत.

पण आता खुद्द पवारांचे नातू रोहित पवार या कामात लक्ष घालत आहेत म्हणून याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

हेही पहा : इतिहास ‘अर्थसंकल्पा’चा
https://www.youtube.com/watch?v=TJuTibHMcVA

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!