Share

राज्यभरातील बसस्थानके असुरक्षित; औरंगाबादेतील रहिवाशाची कोर्टात धाव!

Published On: 

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राज्यभरातील बस स्थानकांमध्ये सुविधांचा अभाव आहेच. त्यासोबतच सुरक्षेचाही मोठ्या प्रमाणावर अभाव आहे. बस स्थानकांमध्ये असलेल्या गैरसोयीबद्दल औरंगाबादचे रहिवासी मुकेश भट यांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

बस स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेसह विविध सुविधांबद्दल या याचिकेच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले आहे. भट्ट यांनी याचिका दाखल करताना औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकातून काही महिन्यांपूर्वी एका खाजगी एजंटने पाचशे रुपयासाठी एखाद्या विद्यार्थ्याचे अपहरण करून खून केल्याचा संदर्भ दिला आहे. महामंडळाच्या बस स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात यावी यासाठी विभागीय नियंत्रकांकडे अर्ज केला आहे.

पण त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. असे भट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. एसटी महामंडळाच्या राज्यभरातील सर्वच स्थानकांवर सुरक्षेचा अभाव आहे. अनधिकृत खासगी ट्रॅव्हल एजंट्सचा नागरिकांना त्रास होतो. हे एजंट प्रवाशांना एसटी महामंडळाच्या बसमध्ये जाणार जाण्यापासून थांबवतात. बस स्थानकाच्या आवारात सुरक्षारक्षक नसतात. असे अनेक मुद्दे भट्ट यांनी याचिकेत नमूद केले आहेत. त्यांच्याकडून ॲड. अक्षय लोहाडे व ॲड. संदेश हंगे काम पाहत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!