Share

अवघ्या सहा दिवसात उभारलेल्या ‘कोविड १९‘ हाॅस्पीटलचे लोकार्पण

Published On: 

लोणी २ (प्रतिनिधी) : प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या वतीने फक्त सहा दिवसात उभारण्यात आलेले ‘कोविड १९‘ हे हाॅस्पीटल मीराज्यातील जनतेला अर्पण करतो व याप्रसंगी साईबाबा चरणी प्रार्थना करतो की या हाॅस्पीटलची गरज कोणाला लागु नये. आम्ही येणाऱ्या संकटाची चाहूल व या भागातील नागरिकांच्या काळजी पोटी १०० बेडचे हे रुग्णालय उभारले आहे असेमनोगत प्रवरा मेडिकल ट्रस्टचे कार्यकारी संचालक डाॅ राजेंद्र विखे पाटील यांनी व्यक्त केले.

प्रवरा मेडिकल ट्रस्टने कोरोनाच्या रुग्णांच्या उपचारासाठी स्वयं प्रेरणेतून फक्त सहा दिवसात उभारलेल्या या १०० बेडच्याहाॅस्पीटलचे लोकार्पण आज झाले. यावेळी डाॅ राजेंद्र विखे पाटील बोलत होते. यावेळी प्रवरा आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरुडाॅ. वाय. एम.जयराज, मेडीसीन विभाग प्रमुख डाॅ सतिश महाजन उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलतांना डाॅ राजेंद्र विखे पाटील यांनी ‘कोविड १९‘हे रुग्णालय सामाजिक बांधिलकी म्हणुन आम्ही सुरु केलेआहे. यात आता ६ बेड आयसीयुचे आहे तर इतर ९४ बेड हे आयसोलेशनचे आहेत . यासाठी डाॅक्टर, नर्स, पराॅमेडीकल असे मिळुन ५०० स्टाफची टीम तयार करण्यात आली असुन. त्याचे प्रशिक्षण ही झाले आहे. हे रुग्णालय चालवण्यासाठीखर्च मोठ्या प्रमाणात येणार आहे.तरी समाज्यातील देणगीदार व्यक्ती व संस्था यांनी पुढे येऊन आर्थिक व तंत्रज्ञानाचीमदत केली तर हे अधिक चांगल्या प्रकारे चालविता येईल असे सांगत मदतीचे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

राज्य सराकरने तातडीने या रुग्णालयात चालवण्यासाठी निधी व चाचणी करण्याची सुविधा आम्हाला उपलब्ध करुनदिली पाहिजे. तसेच स्थानिक लोकसभा सदस्य असलेल्या व्यक्तीने सक्रीय मदत केली पाहिजे. फक्त आश्वासन नकोअसा टोला पण त्यांनी नाव न घेता खासदार सदाशिव लोखंडे यांना पुढे बोलतांना डाॅ . विखे यांनी लगावला. याप्रसंगी पत्रकारांना हाॅस्पीटल चालवण्या करता करण्यात आलेल्या तयारीची व नियोजनाची माहिती डाॅ. सतिश महाजनयांनी दिली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!