दिल्ली : देशासाठी महत्वाची बातमी आता समोर येत आहे. दहशतवादी हल्ला करण्यासाठी हालचाली सुरु असताना दिल्ली पोलिसांनी एकाला अटक केली असून अधिक चौकशी करण्यात येत आहे. यामुळे धक्कादायक घटना समोर येत असून पोलिसांनी वेळीच केलेल्या या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
आजपासून देशभरात गणेशोत्सव सामाजिक भान पाळत साजरा केला जात आहे. या गणेशोत्सवावर आधीच कोरोनाचे सावट असल्याने निर्बंध आले असतानाच दिल्लीत पोलिसांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे आणखी एक मोठे संकट देशावर येत असतानाच ते टळले आहे. दिल्लीत आज सकाळी याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी धडक कारवाई केली यानंतर चकमक सुरु असून एका दहशतवाद्याल ताब्यात घेण्यात आल्याचे समजत आहे.
गणेशोत्सव: बघा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे खास रूप!
Delhi: One ISIS operative arrested with Improvised Explosive Devices (IEDs) by Delhi Police Special Cell earlier today, after an exchange of fire at Dhaula Kuan; visuals from the incident site. pic.twitter.com/gGjsptIs5s
— ANI (@ANI) August 22, 2020
हे दहशतवादी इसिसचे असल्याची प्राथमिक माहिती असून या दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणत IED स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे. धौलकुआन येथे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने केलेल्या चकमकीनंतर या दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मोठं विघ्न टळले असून या दहशतवाद्यांच नेमकं लक्ष्य काय होतं याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.
गणेशोत्सव: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या खास शुभेच्छा, सामाजिक भान राखण्याचे केले आवाहन

