दिल्ली: महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस अशा प्रमुख तीन पक्षांचे मिळून सत्ता आहे. एकीकडे सगळं आलबेल चालल्याचे देखील सांगितले जात असले तरी वारंवार काँग्रेसमधील कुरबुरी या सामोर आल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे सरकार टिकवण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत असल्याचे दिसून आले. मधल्या काळात हि नाराजी दूर करण्यात यश आल्याचे जरी म्हटले जात असले तरी आता काँग्रेस नेते हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीला जाणार असल्याचे समजत आहे. हे तीनचाकी सरकार कधीही पडू शकेल असे भाजपाने वर्तवलेले भाकीत खरे ठरणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे.
काँग्रेससमधील आमदार ते मंत्री अशा अनेकांची नाराजी असल्याचे कळून येत होते. तसेच, काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती, मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मध्यस्थी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत घेतलेल्या बैठकीत हि नाराजी दूर झाल्याचे समोर आले होते. सुरुवातीपासून मिळणाऱ्या वागणुकीवरून काँग्रेसने वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे.
खरा योद्धा : आईच्या निधनानंतर राजेश टोपे केवळ तीनच दिवसांत उतरले कोरोनाविरुद्धच्या लढाईत !
तर, आता याच नाराजी नाट्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीबाबत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांची वेळ मागितल्याचे वृत्त समोर येत आहे. सोमवारी व मंगळवारी सोनिया गांधी यांची वेळ मिळू शकते असे आता समजत आहे. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीला झुकते माप दिले जाते असा आरोप करत राज्यातील काँग्रेस नेत्यांसह आमदारांनी देखील नाराजीचा सूर उभारला होता.
भाजप नेता म्हणतो आता भारतात ‘रामराज्य’ येईल…
यामुळे राजकीय भूकंप घडण्याची चिन्हे दिसत असून कालच, महाविकास आघाडीतील दुसरा मोठा पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची देखील बैठक मुंबईमध्ये पार पडली. यावेळी, आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री व राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ, यांच्यासह सर्व प्रमुख मंत्री, सर्व खासदार आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते.
जातीचा दाखला ,नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्राची अट शिथिल करून वाढीव मुदत देण्याची युवक काँग्रेसची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
