Share

इजिप्तमधील मशिदीवर दहशतवादी हल्ला;तब्बल २३५ जणांचा मृत्यू

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : दहशतवाद्यांच्या हल्ल्यानं पुन्हा एकदा इजिप्त हादरलं आहे.अल-अरिश शहरातील रवाडा मशिदीमध्ये नमाजाच्या वेळी दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले. तसंच अंधाधुंद गोळीबारही केला. उत्तर सिनई प्रांतातल्या मशिदीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तब्बल 235 जणांचा मृत्यू झाला आहे तर सव्वाशेहून अधिक जण जखमी झाले आहेत.

उत्तर सिनाई हा इजिप्तमधील अशांत प्रांत म्हणून ओळखला जातो. या भागाच्या पश्चिमेला साधारणत: ४० किलोमीटर अंतरावर रवाडा मशीद आहे. या मशिदीत नमाज सुरु असताना दहशतवाद्यांनी बॉम्बहल्ला केला. यामध्ये २३५ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती अल-अहराम या सरकारी वर्तमानपत्राच्या संकेतस्थळाने दिली. दहशतवाद्यांच्या बॉम्बहल्ल्यात आणि गोळीबारात जवळपास १०० जण जखमी आले आहेत.

उत्तर सिनाई प्रांत दहशतवादी हल्ल्याने हादरल्यावर इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतह अल सीसी यांनी तातडीची बैठक बोलावली. इजिप्तचे सैन्य उत्तर सिनाई प्रांतात आयसिस या दहशतवादी संघटनेविरोधात धडक कारवाई करत असताना हा हल्ला झाला. या भागात आधीही दहशतवाद्यांनी शेकडो पोलीस कर्मचारी आणि सैनिकांच्या हत्या केल्या आहेत. याशिवाय प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या नागरिकांच्याही आयसिसच्या दहशतवाद्यांकडून क्रूर हत्या करण्यात आल्या आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!