नवी दिल्ली : महाराष्ट्रात आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मुंबई आणि उल्हासनगरमधील प्रत्येकी एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 47 वर पोहोचला आहे.
तसेच पश्चिम बंगालमध्ये एका अधिकाऱ्याच्या मुलाला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. या मुलाने कोरोना चाचणीला नकार दिला होता. त्यानंतर त्याने तीन दिवस अनेकांच्या भेटीगाठी घेतल्याची माहिती आहे. यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज झाल्या असून मुलाला तपासणी न करताच सोडल्याने अधिकाऱ्यांना झापलं आहे.
याचप्रमाणे मुंबईतील 22 वर्षीय महिला इंग्लंडवरुन परतली आहे. तिला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. तर उल्हासनगरमधील 49 वर्षीय महिला दुबईवरुन आली असून, तिला सुद्धा कोरोनाची बाधा झाली आहे.
दरम्यान, चीनमधील वुहान येथून फैलाव झालेल्या करोना विषाणूची लागण जगभरातील एक लाख ९७ हजराहून अधिक जणांना झाली आहे. तर करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या सात हजारहून अधिक झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही या आजाराला जागतिक महामारी म्हणून घोषित केलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
