Share

साथीदार असल्याच्या संशयावरून दुचाकी चोरी प्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : घरासमोर हॅन्‍डल लॉक करुन उभी केलेली दुचाकी चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना १६ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी बी.डी. तारे यांनी सेावमारी दि.१४ दिले. गौसखा कालेखा पठाण (३५, रा. नाणेगाव ता. सिल्लोड, ह.मु ब्रिजवाडी) आणि नवाबखा उस्‍मानखा पठाण (४०, रा. गोद्री ता. भोकरदन जि. जालना) अशी आरोपींची नावे आहेत.

शहाबाजार बक्कलगुडा येथे राहणारा अमान खान जफर खान (२१) याने ३० एप्रिल रोजी सायंकाळी नेहमी प्रमाणे दुचाकी (क्रं. एमएच-२०-डीझेड-७८७३) घरासमोर हॅन्‍डल लॉक करुन उभी केली असता चोरट्यांनी ती लंपास केली. प्रकरणात सिटीचौक पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

दोघा आरोपींना अटक करुन पोलिसांनी अमान खान यांची चोरलेली दुचाकी आरोपींकडून जप्‍त केली. आरोपींना आज न्‍यायालात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी आरोपींनी दुचाकीवरील बनवाट नंबर प्‍लेट कोणाकडून बनवली तसेच आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत काय याचा तपास करणे असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!