🕒 1 min read
मुंबई : कोरोना विषाणूने जगला आपल्या कवेत घेतलं आहे. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी २३ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. सध्या या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू आहे.
तसेच यावेळी सर्व लॉकडाऊन आहे. कोणी परदेशात अडकलं आहे तर कोणी इतर राज्यात. याचप्रमाणे मराठी सिनेसृष्टीतली अभिनेत्री प्रार्थना बेहरे देखील या वेगळ्या अनुभावाला सामोरी गेली आहे.
लॉकडाऊन घोषित केला तेव्हा प्रार्थना तिच्या माहेरी वडोदरा इथं होती. पण तिचा नवरा मुंबईत होता. अचानक घोषित झालेल्या लॉकडाऊनमुळं तिला मुंबईत येता आलं नाही. मात्र अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही तब्बल ५० दिवसांनंतर तिच्या घरी आली आहे.

दरम्यान, प्रार्थनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिनं नवऱ्यासोबतचा एक फोटो टाकत ‘मी घरी आलेय’ असं कॅप्शनही लिहीलं आहे. #after50days हा हॅशटॅग वापर तिनं ५० दिवसानंतर नवऱ्याची भेट झाल्याचं सांगितलं.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
