🕒 1 min read
नवी दिल्ली : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक राजकीय नेते देखील या विषाणूच्या विळख्यात अडकल्याचे चित्र आहे. यातच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांना कोरोनाची लक्षणे दिसत होती. 28 मे रोजी म्हणूनच त्यांना गुरूग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आप सभी के आशीर्वाद और प्रार्थना के बल से मैं स्वास्थ्य लाभ कर अपने घर लौटा हूँ।
सम्पूर्ण रूप से ठीक होने में और थोड़ा वक्त लगेगा।
आप सभी को आपके आशीर्वाद के लिए मेरा दंडवत् प्रणाम????— Sambit Patra (@sambitswaraj) June 9, 2020
आता या भाजपच्या लढवय्या नेत्याला रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. ट्विटवरून त्यांनी ही माहिती दिली आहे. पात्रा म्हणाले की तुमच्या आशिर्वादामुळे मी ठीक झालो आहे आणि घरी आलो आहे. माझी तब्येत पूर्ण सुधरायला अजून वेळ लागेल लोकांनी दिलेल्या आशिर्वादासाठी पात्रा यांनी आभार मानले आहे.
अच्छे दिन कुठे आहेत? खासदार नुसरत जहाँ यांचा अमित शाह यांना थेट सवाल
एका बाजूला भाजपसाठी ही दिलासादायक बातमी आली असताना आता तिकडे कॉंग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये दाखल झालेले मध्य प्रदेशातील भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांची तब्येत अचानक बिघडली आहे. त्यांना दिल्लीतील एका रुग्णायात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. ज्योतिरादित्य यांच्यासोबत त्यांच्या आईलाही हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचं कळतंय.
ज्योतिरादित्य सिंधिया यांची सोमवारी संध्याकाळी तब्येत बिघडल्यानंतर उपचारासाठी मॅक्स रुग्णालयात पोहोचले होते. तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर आता त्यांना अॅडमिट करून घेण्यात आलं आहे. त्यानंतर आज सकाळपासून त्यांची विविध प्रकारची वैद्यकीय तपासणी सुरू आहे.
भाजपनेते ज्योतिरादित्य सिंधिया यांची तब्ब्येत अचानक बिघडली, हॉस्पिटलमध्ये केलं अॅडमिट
दरम्यान, काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली होती.विविध माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार,मुख्यमंत्री केजरीवाल यांना ताप आणि खोकला येत असल्याने त्यांची आता कोरोना टेस्ट होणार आहे. त्यांच्या सर्व नियोजीत बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. त्यानंतर त्यांनी कोणाचीच भेट देखील घेतलेली नाही. त्यांनी स्वत:ला आयसोलेट केलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
