नागपूर : महाराष्ट्रातील विधानपरिषदेसाठी (स्थानिक स्वराज्य संस्था) घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी आज मतमोजणी झाली. नागपूर (Nagpur) विधानपरिषदेच्या जागेवर भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे विजयी झाले आहेत. काँग्रेसने अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांना पाठिंबा दिला होता. देशमुख यांचा पराभव करत बावनकुळे यांनी बाजी मारली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२ मतं मिळाली. काँग्रेस समर्थित उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६ मतं मिळाली. तर, छोटू भोयर यांना १ मत मिळालं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी २७८ मतांचा कोटा पूर्ण केला आहे.
निवडणूक आयोगाने राज्यातील सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता, त्यापैकी चार जागा बिनविरोध निवडून आल्या तर नागपूर आणि अकोला, वाशिम, बुलडाणा या स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्ये निवडणूक लागली होती. अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) आणि भाजपचे वसंत खंडेलवाल (Vasant Khandelwal) यांच्यात चुरशीची लढत झाली.
नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. काँग्रेसला ऐनवेळी उमदेवार बदलावा लागला होता. छोटू भोयर यांच्या जागेवर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसने पाठिंबा दिला होता. आज या निवडणुकीची मतमोजणी पार पडली असून नागपूर विधान परिषदेच्या जागेवर भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाजी मारली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘विचारांची वीज कोसळावी तसे राहुल गांधींनी हिंदू राज्य आणण्याचा बार उडवला’
- सामाजिक एकोप्यातून देशाची प्रगती-चंद्रकांत खैरे
- आगामी महापालिका निवडणुकीत सेना-राष्ट्रवादी एकत्र येणार काय? राज ठाकरे म्हणतात…
- आगामी महापालिका निवडणुकीत सेना-राष्ट्रवादी एकत्र येणार काय? राज ठाकरे म्हणतात…
- कतरिनाच्या भावाचं ‘या’ मराठमोळया अभिनेत्रीने चोरलं काळीज

