🕒 1 min read
मुंबई – २०१४ नंतर राज्यासह देशात भाजपचं सरकार आलं आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांनी देखील भाजपमध्ये उडी घेतली होती. आता, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर भाजपमधून आऊटगोईंग सुरु झाले आहे.
काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व पालघर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुनिल भुसारा यांच्या नेतृत्वाखाली पालघर जिल्ह्यातील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, पालघर जिल्हा परिषद बांधकाम व अर्थ सभापती काशिनाथ चौधरी, पालघर जिल्हा ओबीसी जिल्हाध्यक्ष तथा गटनेते नरेश आकारे, पालघर जिल्हा सरचिटणीस अशोक गव्हाळे उपस्थित होते.
दरम्यान,नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला देखील खिंडार पाडलं आहे.वंचित बहुजन आघाडीतील गणेश जाधव, सुधीर आंब्रे, ज्योती कांबळे, प्रकाश यादव, दीपक तांबे, रेखा मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रवेश केलेले कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सामाजिक न्याय विभागात काम करणार आहेत.
यासोबतच, चांदणी मुन्नी अन्सारी यांनी पक्षाच्या एलजिबीटी सेलमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह सामाजिक न्याय विभागाचे मुंबई अध्यक्ष सुनील शिंदे, मुंबई विभागीय युवती अध्यक्ष अदिती नलावडे, माजी नगरसेवक अजित रावराणे, सामाजिक न्याय विभाग मुंबई निरीक्षक जोतिराम सोनवणे उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- अक्षयच्या ‘बेल बॉटम’ चित्रपटामध्ये नोरा करणार रेट्रो आयटम साँग
- पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांसाठी मान्यता प्राप्त राजकीय पक्षांची आज बैठक
- भाजपवाल्यांना सवतीची पोरं मांडीवर खेळवण्यात मौज वाटू लागली आहे
- ‘अर्णब गोस्वामी यांना झालेली अटक हा पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारा प्रकार’
- महाराष्ट्रात नावलौकीक मिळविणारे निलेश लंके यांच्या रूपाने मला भाऊ मिळाला- सुप्रिया सुळे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
