मुंबई : ‘मी मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवर चर्चा केली आणि कोरोनाविरुद्धच्या या लढाईत भाजपा राज्य सरकारसोबत आहे. या संकटसमयी आम्ही सारे सोबत आहोत,’ असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. असं ट्वीट फडणवीस यांनी केलं आहे.
पुढे ते म्हणाले, ‘राज्य सरकारला या समस्येला सामोरे जाण्यासाठी जे काही कठोर निर्णय घ्यावेसे वाटत असतील, ते त्यांनी जरूर घ्यावे. आम्ही भाजपा आणि विरोधी पक्ष म्हणून त्यांच्यासोबत आहोत असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Spoke to @CMOMaharashtra Shri Uddhav Thackeray ji and assured all the cooperation from @BJP4Maharashtra to State Government efforts against #Coronavirus
We all are together in this war.#IndiaFightsCorona— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 2, 2020
तसेच राज्यात आज दिवसभरात 88 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक 54 रुग्ण हे मुंबईतील आहेत. तर पुण्यात 11 आणि अहमदनगरच्या 9 जणांना रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 9 जण मुंबईच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील आहेत. तर औरंगाबादचे 2, सातारा, उस्मानाबाद, बुलडाण्याचे प्रत्येकी 1 रुग्ण आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 424 झाली आहे.
दरम्यान, लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर जीवनावश्यक वस्तुंची दुकानं सुरु ठेवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील नियमित फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. या संकटात सत्ताधाऱ्यांसोबत विरोधी पक्ष देखील एकत्र आला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

