मुंबई : मुंबईच्या महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात भाजप अविश्वास ठराव मांडणार आहे. सभागृहाची बैठक तातडीनं बोलवावी असून यासाठी भाजपचं महापौरांना पत्र लिहिले आहे..
कोरोनाकाळात मुंबई महापालिका प्रशासनानं अनेक वस्तूंची जास्त दरात खरेदी केली आहे. याबाबत अनेक वेळा तक्रार करण्यात आली आहे. पण त्याकडे कुणी लक्षच देत नाही असा भाजपचा आरोप आहे. मनमानी कारभार करणाऱ्या मुंबई महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी पालिका सभागृहाची बैठक आयोजित करावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे, पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
यामुळे आता महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. याबाबत अन्य पक्षांच्या गटनेत्यांशी चर्चा करण्यात आली आहे. दरम्यान कंगना प्रकरणावरून भाजपने अधीच शिवसेनेला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मुंबईत शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
विद्यापीठाच्या निर्णयात स्पष्टता नसून फक्त गोंधळ, ऑनलाइन परिक्षा देणार कशी- कमलाकर शेटे
आरबीआयच्या मोरटोरियम योजनेवर 28 सप्टेंबरला पुन्हा सुनावणी
आता मूक मोर्चे नाहीच… आता संघर्ष अटळ, नितेश राणे आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

