Share

भाजपचा जाहीरनामा : पाचवीपासून पाठ्यपुस्तकात शेतीवर आधारीत अभ्यासक्रम लागू करणार

Published On: 

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपले संकल्पपत्र प्रकाशित केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याची घोषणा केली. गेल्या पाच वर्षांत जे काम झाले. त्याचा अनुभव आणि भविष्यातील दिशा लक्षात घेवून हे संकल्पपत्र तयार केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत मुंबईत या ‘संकल्प पत्रा’चे प्रकाशन करण्यात आले. राज्याच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही या संकल्प पत्रातून देण्यात आली आहे.

दरम्यान, एका बाजूला राज्य आणि केंद्र सरकारवर बेरोजगारीच्या मुद्द्यावरून टीका होत असताना आता भाजपने आपल्या जाहीरनाम्यात येत्या ५ वर्षात १ कोटी रोजगार देणार असल्याचं म्हटलं आहे. १ कोटी महिलांना बचत गटाशी जोडणार मुलभूत सुविधांसाठी ५ लाख कोटी केंद्र सरकारच्या माध्यमातून गुंतवणूक करणार रस्ते दुरुस्तीसाठी स्वतंत्र्य तंत्रज्ञान विकसित करणारअसल्याचं देखील या जाहीरनाम्यात सांगण्यात आलं आहे.

पाच वर्षात आयआयटी, आयआयएम आणि एम्स सारख्या नव्या संस्था उभारणार

पाचवीपासून पाठ्यपुस्तकात शेतीवर आधारीत अभ्यासक्रम लागू करणार

महाराष्ट्रातील विविध शहरांत पाच आयटी पार्क उभारणार

मुंबईः २०२२ पर्यंत शुद्ध पाणी संपूर्ण महाराष्टात पोहचवणार

शाश्वत शेतीसाठी महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार

२०२२ पर्यंत सर्वांना शुद्ध पाणी देणार

सर्व प्रकारच्या कामगारांची नोंदणी करून त्यांना सामाजिक सुरक्षा देणार, भाजपचा संकल्प

संपूर्ण महाराष्ट्र इंटरनेटने जोडणार

येत्या पाच वर्षांत १ कोटी रोजगार निर्माण करणार

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1183988086864138240?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1183987749612736512?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!