Share

उद्धवजी, देर आये दुरुस्त आये ! सिद्धार्थ शिरोळेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Published On: 

पुणे : कोरोना संसर्गाचे पुण्यात चार महिन्यांपासून थैमान चालू आहे, वैद्यकीय सुविधांची हेळसांड झाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले. ही गंभीर स्थिती लक्षात घेऊन मुख्य मंत्र्यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी वारंवार केली. अखेर चार महिन्यानंतर नंतर काल (गुरुवारी) ते पुण्यात भेट देण्यासाठी आले. यावर ‘देर आये, दुरुस्त आये’ अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार शिरोळे यांनी दिली आणि वैद्यकीय सुविधा तातडीने मिळाव्यात या मागणीचा पुनरुच्चार केला.

कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्य मंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार, आमदार, महापौर आणि वरीष्ठ शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत काल बैठक झाली. त्या बैठकीत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सहभाग घेतला आणि चर्चेत अडचणी आणि सूचना मांडल्या.

टेस्टिंग, रुग्णालयातील सेवा तसेच उपचार मिळण्यात पुणे फार मागे पडलेले आहे. याकरीता मुख्य मंत्र्यांनी स्वतः नियोजित तीन कोविड केअर सेंटर्स येत्या दहा, बारा दिवसात उभी रहातील याकडे लक्ष द्यावे. लाल फितीच्या कारभारात किंवा ढिसाळ नियोजनात ती अडकून पडू नयेत, कारण केंद्र उभारणीत होणारा विलंब परवडणारा नाही, रुग्णांच्या जिवीताशी तो खेळ होईल. असे आमदार शिरोळे यांनी बैठकीत सांगितले.

कोरोना संसर्गाचे पुण्यातील चित्र फारच विदारक आहे. त्याचा वास्तववादी अहवाल (रिपोर्ट) प्रत्येक लोकप्रतिनिधीला सरकारने द्यावा. आम्ही सर्व या आजाराबाबत गांभीर्याने हालचाली करत आहोतच. अहवाल मिळाल्यानंतर आमच्यापुढे सर्व परिस्थितीबाबत अधिक स्पष्टता येईल असे शिरोळे यांनी सांगितले.

पावसात भाषण कधी करायचं, हे रावसाहेब दानवेंना अजून कळणार नाही – जयंत पाटील

पुण्यात कोरोना संसर्गाने झालेल्या मृत्यूंपैकी चाळीस टक्के मृत्यू हे वेळीच वैद्यकीय उपचार न मिळाल्याने झाले आहेत. यातही एक बाब अशी लक्षात आलेली आहे की, लोकं वेळीच टेस्टिंग करत नाहीत. आजार विकोपाला गेला की रुग्णालयात दाखल होतात. त्यातूनही मृत्यू घडतात. लोकांच्या मनात कोरोना संसर्ग आणि त्यासाठीचे टेस्टिंग याची भिती आणि गैरसमज आहेत ते दूर व्हायला हवेत. योग्य वेळी टेस्टिंग करुन घेऊन कोरोनाचे निदान झाल्यास नेमके उपचार होऊन रुग्ण बरे होतात. याबाबतही जनजागृती व्हावी. त्यातून टेस्टिंगचे प्रमाण वाढेल. मृत्यूदर कमी होण्याच्या दृष्टीने वेळीच टेस्टिंग होणे आणि वैद्यकीय उपचार मिळणे आवश्यक आहे या कामाकरीता लोकसहभाग घ्यावा आणि त्यामार्फत यंत्रणा उभी केली जावी अशी सूचना शिरोळे यांनी मुख्य मंत्र्यांना केली. शासनाने ठरविलेल्या उपचारांच्या दरपत्रकाचा जीआर काही रुग्णालयांना अद्याप मिळालेला नाही. ही त्रुटी लवकर भरुन काढावी अशी सूचना शिरोळे यांनी केली.

कोरोना रुग्णाला त्याच्या नातेवाईकांना भेटता येत नाही त्यामुळे त्याच्यावर चालू असलेल्या उपचारांची माहिती त्याच्या नातेवाईकांना, उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून रोजच दिली जावी अशी सूचनाही शिरोळे यांनी केली. राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनासंदर्भात राज्यभर सर्वत्र भेटी देऊन या संसर्गाचे गांभीर्य जाणून घेतले. ते लोकांच्या, सरकारच्या निदर्शनास आणून दिले. फडणवीस यांचे हे काम प्रशंसनीय आणि महत्त्वपूर्ण आहे असेही शिरोळे म्हणाले.

‘आता मी देखील पावसात भाषण केलं, पुढच्या वेळेस हमखास यश मिळणार’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!