मुंबई: शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी (Bhavna Gawali) यांच्यावर सध्या ईडीची (ED) कारवाई सुरू आहे. त्यांच्यावर १०० कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. त्यानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली आहे.शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीने अनेक वेळा चौकशीसाठी हजर राहायला सांगितले होते, मात्र त्या हजर राहिल्या नाहीत. या आधी समन्स वेळेवर मिळाला नाही म्हणत आणखी १५ दिवसांचा वेळ भावना गवळी यांनी मागितला होता. मात्र तरीही त्या ईडी समोर हजर राहिल्या नाहीत.
भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये 17 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते हरिष सारडा (Harish Sarda) यांनी भावना गवळी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. हरिष सारडा यांनी भावना गवळी यांनी एनसीडीसीकडून (NCDC) कर्ज घेतलं होतं मात्र, ती कंपनी कधीच सुरु केली नव्हती, असा दावा देखील त्यांनी केला होता. आता पुन्हा एकदा ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे मात्र यावेळेस देखील त्या हजर राहिल्या नाहीत, या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
शिवसेना नेत्या भावना गवळी तिसऱ्यांदा ED समक्ष गैरहजर
किती दिवस पळणार
अखेर ₹100 कोटींचा हिशोब तर द्यावाच लागणार@BJP4Maharashtra pic.twitter.com/NLkRQAbR9a
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 24, 2021
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर एक विडियो पोस्ट केला आहे. या पोस्ट मधून त्यांनी थेट शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर निशाणा साधला आहे. आणखी किती दिवस पळणार, असा प्रश्न विचारत त्यांनी भावना गवळी यांच्यावर टिका केली आहे. शिवसेना खासदार भावना गवळी तिसऱ्यांदा ईडी समोर गैरहजर राहिल्या आहेत, असं म्हणत किरीट सोमय्या यांनी किती दिवस पळणार, हिशोब तर द्यावाच लागणार, असा टोला देखील किरीट सोमय्या यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- अमरावती हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत ३१५ जणांना अटक
- पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात काळे मास्क, टोपी आणि काळे कपडे घालण्यास बंदी
- धक्कादायक! गौतम गंभीरला ‘इसिस’कडून जीवे मारण्याची धमकी
- भाजपला मोठा धक्का; नीट वागणूक दिली जात नाही म्हणत ‘या’ ज्येष्ठ नेत्याने दिला राजीनामा
- राज्यातील तीन हजारांवर एसटी कर्मचारी निलंबीत

