दिल्ली: वेगवेगळ्या मुद्यांवर रोखठोक भूमिका घेणारे भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी आता भाजपच्या आयटी सेलवर भडकले आहेत. मागील काही दिवसांपासून मला भाजपची आयटी सेल वैयक्तिक पातळीवर टिका करत असून अशा लोकांना तात्काळ कारवाई करून हटवलं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.यासंदर्भात त्यांनी ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे.
The BJP IT cell has gone rogue. Some of its members are putting out fake ID tweets to make personal attacks on me. If my angered followers make counter personal attacks I cannot be held resonsible just as BJP cannot be held respinsible for the rogue IT cell of the party
— Subramanian Swamy (@Swamy39) September 7, 2020
स्वामी यांच्या ट्विटवर एका समर्थकांनं ट्रोल करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचं आवाहन केलं. “आपण टीकेपेक्षा वरचढ आहात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. आपण त्यांना महत्त्व देत असाल, तर तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहात,” असं म्हटलं आहे.त्यावर बोलता स्वामी म्हणाले,”मी त्यांच्याकडे दुर्लक्षच करतोय, पण भाजपानं त्यांची हकालपट्टी करावी. एक मालवीय नावाचं पात्र आहे, घाणेरडा दंगा करत आहे. आपला पक्ष मर्यादा पुरूषोत्तम रामाचा पक्ष आहे, रावण किंवा दुःशासनाचा नाही,” असं स्वामी यांनी म्हटलं आहे.
धमकीचे फोन खरे की खोटे याची चौकशी करा-विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
सुब्रमण्य स्वामी हे भाजपाचे असे खासदार आहेत, जे पक्षाच्या विरोधातही भूमिका मांडतांना दिसतात. मात्र, यावेळी स्वामी यांनी पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्याविरोधातच बंड पुकारलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी मालवीय यांची हकालपट्टी करण्याची मागणीही पक्षाकडे केली आहे.
विधानपरिषद उपसभापती निवडणूक : महाविकास आघाडीकडून नीलम गोऱ्हेंचा अर्ज दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

