Share

विधानपरिषद उपसभापती निवडणूक : महाविकास आघाडीकडून नीलम गोऱ्हेंचा अर्ज दाखल

Published On: 

मुंबई : मंगळवारी होणाऱ्या विधानपरिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार घोषित केला असून त्याचा अर्जही दाखल करण्यात आला आहे. भाजपकडून भाई गिरकर तर महाविकास आघाडी कडून आमदार निलम गोऱ्हे यांनीही अर्ज दाखल केला आहे. आमदार कपिल पाटील यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती, भाजप त्यांना पाठिंबा देणार होतं पण आता भाजपने आपला स्वतंत्र उमेदवार दिल्याने एक वेगळी लढत बघायला मिळणार आहे.

भाजपचे आणि इतर पक्षांचे मिळून संख्याबळ २९ होत आहे. तर महाविकासआघाडी मधील तिन्ही पक्षांचं संख्याबळ ३१ होतंय. त्यामुळे प्रथम दर्शनी नीलम गोऱ्हे यांचा विजय सुनिश्चित वाटत आहे.

विधानपरिषद उपसभापती निवडणूक: भाजपच्या उमेदवाराचा अर्ज दाखल

दरम्यान, विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा पहिलाच दिवस हा वादळी ठरला आहे. ग्राम पंचायतीमध्ये प्रशासक नेमणूक करण्यात आली होती. त्याबद्दल सुधारणा विधेयक मांडण्यात आले. परंतु, भाजपने या विधेयकावर जोरदार आक्षेप घेतला.

विधानपरिषदेतील पक्षनिहाय संख्याबळ

शिवसेना- १४

राष्ट्रवादी काँग्रेस- ९

काँग्रेस- ८

भाजप- २२

शेकाप- १

रासप- १

लोकभारती- १

अपक्ष- ४

कंगणावर देशद्रोहाचा खटला दाखल करा,शिवसेनाच्या या आमदाराचं विधानसभा अध्यक्षांना पत्र

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!