मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीला उडवून देण्याच्या धमकीनंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमक्या मिळाल्या आहेत. गृहमंत्री अनिल देशमुखांनाही धमकी मिळाल्याची प्राथमिक माहिती आहे. या सर्व प्रकरणांवर आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, धमकीचे फोन खरे आहेत की खोटे याची चौकशी केली पाहिजे असले प्रकार कुणी जाणिवपूर्वक तर करत नाही ना? अशी शंका फडणवीसांनी घेतली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच निवासस्थान असलेल्या मातोश्रीला उडवून देण्याच्या धमकीला एक दिवस उलटत नाही तर आता माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांंना धमकी आल्याची माहिती समोर येत असून याबाबत गृहमंत्रालयाच्या सुत्रांनी माहिती दिली आहे. हे फोन बाहेरच्या देशातून होते अस त्यांच म्हणणं आहे. दरम्यान कंगणा रणौतवर गृहमंत्र्यांनी टिप्पणी केल्यानंतर हे असे फोन येत आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरक्षा यंत्रणा करत आहेत.
विधानपरिषद उपसभापती निवडणूक : महाविकास आघाडीकडून नीलम गोऱ्हेंचा अर्ज दाखल
दरम्यान काल शिवसेनेचे श्रद्धास्थान असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री उडवून देण्याची धमकी मिळाली होती. दुबईवरुन मातोश्रीवर चार फोन आल्याची बातमी समोर आली आहे. यानंतर मातोश्रीची सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. यानंतर आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी या घटनेची माहिती घेतली असून पुढील सुचना देण्यात आल्या आहेत.
रुग्णालयाचा हलगर्जीपणा… नातलगांना सोपविला पुरुषाच्या जागी महिलेचा मृतदेह
दरम्यान याआधीही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणांना धमक्या देण्यात आलेल्या आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनासुद्धा अशाप्रकारे धमक्या देण्यात आल्या होत्या. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्याने हे शहर अतिशय संवेदनशील मानले जाते.कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम देशाबाहेर राहुन मुंबईतील त्याचे अवैध धंदे चालवत असतो. पण आता पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरेंच्या काळात अशी धमकी आल्याने खळबळ उडाली आहे.
रुग्णालयाचा हलगर्जीपणा… नातलगांना सोपविला पुरुषाच्या जागी महिलेचा मृतदेह
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

