Share

Amol Mitkari | “विजय शिवतारे यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये…”; अमोल मिटकरींचा घणाघात 

Published On: 

Amol Mitkari । मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून कर्नाटक सरकारकडून चिथावणीखोर कृत्य आणि वक्तव्ये होत असल्याने सीमावाद उफाळून आला आहे. कर्नाटकातील बेळगाव येथील बागेवाडी येथे मंगळवारी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक केली. या प्रकरणी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी 48 तासांचा अल्टिमेटम देत अन्यथा मी कर्नाटकात जाईल असा इशारा दिला.

यानंतर एकनाथ शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर “48 तासात बेळगावला जाऊन तुम्ही काय दिवे लावणार?”, अशी टीका केली. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत अमोल मिटकरी (Amol Mitkari ) यांनी चांगलंच सुनावलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari ) यांनी ट्विट करत विजय शिवतारे यांच्यावर निशाणा साधला आहे. विजय शिवतारे यांना मेंटल हस्पिटलमध्ये भरती करण्याची वेळ आली असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलंय.

“विजय शिवतारे यांना मेंटल हस्पिटलमध्ये भरती करण्याची वेळ आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांचेवर योग्य वेळी उपचार करावा लागेल”, असं ट्विट अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलंय. यावर शिंदे गटाकडून काय उत्तर येतंय हे पाहावं लागणार आहे.

विजय शिवतारे यांचं वक्तव्य काय?

“48 तासात बेळगावला जाऊन तुम्ही काय दिवे लावणार?” तुम्ही चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता तुम्ही काय केलं?, असा सवाल त्यांनी यावेळी शरद पवार यांना केला आहे. हे फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं शिवतारे म्हणालेत. तर संजय राऊतांना स्किझोफ्रेनिया झाला आहे. त्यांना उपचाराची गरज आहे. त्यांनी सामना ऑफीसपासून जवळ असलेल्या पत्राचाळीतील जी घरं रस्त्यावर आलेत त्या मराठी बांधवांची काळजी करावी, असा टोलाही शिवतारे यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!