🕒 1 min read
मुंबई- एस व टी प्रभाग समितीत अध्यक्ष पद निवडणुकीत भाजप नगरसेवक मतदारांची सर्व मते भाजप उमेदवार जागृती पाटील यांना मिळालेली असतानाही खोटारडेपणाने एक मत अवैध ठरवून मतपत्रिका न दाखवता सभागृहाबाहेर पळविणाऱ्या व स्वतः पळ काढणाऱ्या महापौर व मनपा चिटणीस यांच्या विरोधात भाजप नगरसेवकांकडून महापौर किशोरी पेडणेकर यांच्या दालनासमोर व महापालिका चिटणीस यांच्या दालनासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी मतपत्रिका पळविणा-या महापौरांचा निषेध असो, महापौर मतपत्रिका दाखवा, महापौर राजीनामा द्या, महापालिका चिटणीसांना निलंबीत करा, महापौर हाय हाय अशा घोषणांनी भाजप नगरसेवकांनी जोरदार धरने आंदोलन केले.
भाजपने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १६ ऑक्टोबर २०२० रोजी संध्याकाळी ४.३० वाजता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहामध्ये एस आणि टी प्रभाग समिती अध्यक्ष पदाची निवडणूक पीठासीन अधिकारी श्रीम.किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी एस आणि टी प्रभाग समितीतील एकूण २० मतदार म्हणजेच २० नगरसेवक उपस्थित होते.या प्रभागात पक्षिय बलाबल भारतीय जनता पार्टी १० नगरसेवक, शिवसेना ८ नगरसेवक, काँग्रेस १ नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस १ नगरसेवक असे होते. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार जागृती पाटील या होत्या आणि शिवसेनेच्या उमेदवार दिपमाला बढे या होत्या.
भारतीय जनता पक्षाच्या १० नगरसेवक मतदारांनी तीनही टप्प्यात योग्य प्रकारे मतदान केले आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार जागृती पाटील यांना १० मते मिळाली. याची भाजप नगरसेवक मतदारांनी स्वतः स्वाक्षरी करतानाच खातरजमा केलेली आहे. तरी सुद्धा निवडणुकीचा निकाल भाजप ९ विरुद्ध शिवसेना १० असा घोषित करून महापौरांनी सभागृहाची, बृहन्मुंबई महापालिकेची, प्रभाग समितीची फसवणूक केलेली आहे. या निवडणुकीमध्ये मतदान करताना तीन टप्यात भाजप नगरसेवक मतदारांनी भाजप उमेदवार जागृती पाटील यांना हात वर करुन, आवाजी मतदानाने व अचुक ठिकाणी स्वाक्षरी करुन मतदान केले असतानाही व वरील निवडणुकीचा निकाल हा दोन्ही उमेदवारांना समसमान १०-१० मते असा जाहीर करणे अपेक्षित होते. मग त्यावेळी निवड करण्यासाठी चिट्ठी काढून निवड करण्याची प्रक्रिया पार पाडणे अपेक्षित असताना नेमका याचवेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पीठासीन अधिकारी म्हणून आपला निर्णय दिपमाला बढे यांच्या बाजुने देत महापालिका सभागृहाची फसवणूक केली.
यावेळी सभागृहात उपस्थित मतदार नगरसेवक, खासदार मनोज कोटक आणि गटनेते नगरसेवक प्रभाकर शिंदे व सर्व भाजप नगरसेवक यांनी त्यांना विचारले की भाजपची १० मते असताना ९ मते कशी मिळाली. त्यावेळी त्यांनी १ मत अवैध ठरल्याचे सांगितले.कुठले मत अवैध ठरले, कुणाचे मत अवैध ठरले ते कसे अवैध ठरले हे मतमोजनी पत्रिका दाखवण्यासाठी सर्व भाजप नगरसेवकांनी आग्रह धरला. कुठल्याही निवडणुकीत कुठलेही प्रश्नचिन्ह उभे राहिले तर त्याचे उत्तर दिल्याशिवाय पिठासीन अधिकारी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून बाहेर जात नाहीत असा नियम आहे. त्याचप्रमाणे निवडणुकीत मतपत्रिका स्वाक्षऱ्यांचा कागद हा सभागृहाबाहेर नेला जात नाही असाही नियम आहे. परंतु, या निवडणुकीचा निकाल जाहीर केल्यावर आणि त्याच व त्यावर आक्षेप नोंदविल्यावर घाईघाईने महापौर यांनी स्वाक्षरीचा कागद हा पाकिटात टाकून सभागृहाबाहेर पाठवून दिला आणि कोणतेही समाधानकारक उत्तर न देता महापौर निघून गेल्या. त्यावेळी उपस्थित सर्व भाजप नगरसेवकांनी महानगरपालिका चिटणीस संगिता शर्मा यांच्याकडे मतपत्रिका पाहण्याचा आग्रह धरला.
त्यावेळी असे लक्षात आले की मतपत्रिका आणि महापौर दोन्हीही सभागृहाबाहेर गेले आहेत. म्हणून भाजप नगरसेवक सभागृहाशेजारील १० पावलावरील महापौर दालनात गेलो असता असे लक्षात आले की, महापौर घरी निघून गेल्या आहेत. तरी या फसवणूकीबाबत भारतीय दंड संहिता कायद्यानुसार प्रथम दर्शीनी गुन्हा म्हणजेच एफआयआर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि त्यांना निवडणूक प्रक्रियेत सहकार्य करणाऱ्या महापालिका चिटणीस संगिता शर्मा यांच्या विरोधात कलम ४२० अन्वये नोंदवुन निवडणुकीतील सर्व मुळ कागदपत्रांचा ताबा पोलिस आयुक्त कार्यालयाने घ्यावा अन्यथा या कागदपत्रात फेरफार केला जाण्याची शक्यता आहे अशी मागणी केलेली आहे. तसेच न्यायालयातही सदर बाबत याचिका दाखल केलेली आहे अशी माहिती भाजपा बृहन्मुंबई गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या-
- मुलाला पाहण्यासाठी राज ठाकरे पोहोचले थेट लीलावती हॉस्पिटलमध्ये
- चिनी सैनिकाचा भारतीय हद्दीत प्रवेश, लष्कराने घेतलं ताब्यात
- लोकप्रतिनिधीच महिलांना ‘आइटम’ म्हणत असतील तर इतरांनी काय आदर्श घ्यावा ?
- माझा पराभव झाला तर कदाचित मला देशही सोडावा लागेल- डोनाल्ड ट्रम्प
- घरातील अन्नधान्य भिजलंय खायचं काय ? शेतकरी महिलेचा संभाजीराजेंना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

