Share

राज्याने परिस्थितीनुसार दारुची दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेणे अपेक्षित – आशिष शेलार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनामुळे राज्यात गेली दीड महिना सगळी दारूची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यामध्ये सरकारचा खूप सारा महसूल बुडत होता. याचमुळे अर्थव्यव्यवस्थेला देखील मोठा फटका बसला होता. याच पार्श्वभूमीवर दारूची दुकाने सुरू करून घसरलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा रूळावर आणण्याचे प्रयत्न शासनाने केले आहेत.

यानंतर अनेक ठिकाणी दारूच्या दुकानांबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यामुळे दारू खरेदीसाठी होणारी गर्दी पाहता सरकारसमोर वेगळीच समस्या निर्माण झाली आहे.याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार आशिष शेलार यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

शेलार म्हणतात, ‘केंद्राच्या सूचना असल्या तरी, देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्याने राज्याने परिस्थितीनुसार दारुची दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेणे अपेक्षित आहे’.

दरम्यान, ‘महसूल वाढणार असला तरी कौटुंबिक हिंसाचार, पोलिसांवर ताणही वाढणार. राज्य शासनाने घाई न केल्यास हे सगळ्यांच्याच आरोग्यासाठी उत्तम!,’ असा सल्ला शेलार यांनी राज सरकारला दिला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!