Share

कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी मेटेंकडून मदतीचा हात; मुख्यमंत्री सहायता निधीला लाखोंची मदत

Published On: 

मुंबई : संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने गावातील गरीब व रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबाला दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच गरजू लोकांसाठी अनेक मदतीचे हात देखील पुढे येत आहे. कोरोनाच्या लढ्यासाठी देशातील अनेक दिग्गज मंडळींकडून याचप्रमाणे उद्योजकांकडून मदतीचे हात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. मेटे यांनी एक लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

दरम्यान, राज्यातही आपत्ती असून आपण या राज्याचे नागरिक आहोत. म्हणून ही मदत देत आहे. ही मदत आपण व्यक्तीगत देत आहोत, असं विनायक मेटे यांनी स्पष्ट केलं आहे.

याचप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निधीची तरतूद केली असली तरी या संकटाच्या काळात ती तुटुपुंजी ठरत आहे. अशावेळी मुख्यमंत्री सहायता निधीत मदत करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले होते. यामुळे अनेक मदतीचे हात पुढे येण्यास सरसावले आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!