मुंबई : दिवाळी साजरी करताना गर्दी टाळा… खबरदारी घेऊन महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी नागरिकांना केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेले राज्य टास्क फोर्स व डेथ ऑडिट कमिटीची बैठक आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली.
कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करणे आणि कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीबाबत आढावा यावेळी घेण्यात आला.सध्या कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार असून फिव्हर सर्व्हेलन्स प्रभावीपणे करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
यावर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केले आहे. राज्यात दिवाळीत फटाक्यांवर बंदी नाही, मात्र फटाके न वाजवण्याचं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. फटाक्यांमधून निघणारा धूर कोरोनाबाधित रुग्णासाठी हानीकारक ठरू शकतो, असं भुजबळ म्हणाले आहेत.
दरम्यान, त्यानंतर आता प्लॅस्टिकप्रमाणे मोठ्या आवाजाच्या आणि धूर करणाऱ्या फटाक्यांवर कायमस्वरुपी बंदी आणावी, अशी मागणी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.
“पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विनंती आहे, कृपया मोठे आवाज करणाऱ्या आणि धूर करणाऱ्या फटाक्यांवर, प्लॅस्टिकवर ज्या पद्धतीने बंदी घातली, त्याप्रमाणे कायमस्वरुपी बंदी घाला. पुढच्या येणाऱ्या सात पिढ्या आपल्याला आशीर्वाद देतील” असे ट्विट सत्यजित तांबे यांनी केले आहे.
https://twitter.com/satyajeettambe/status/1324555532930179075?s=20
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून यंदाच्या दिवाळीसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. गृह विभागाने परिपत्रक जारी करुन नागरिकांना दिवाळी साध्या पद्धतीने साजरी करण्याचं आवाहन केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- आदित्यजी ! …तर पुढील सात पिढ्या आपल्याला आशीर्वाद देत राहतील – सत्यजित तांबे
- ‘आमचा यज्ञ होऊ दिला नाही आता तुम्हाला शाप लागेल’ – तुषार भोसले
- व्हॉट्सअॅपवरुन देखील पैसे ट्रान्सफर करता येणार ! व्हॉट्सअॅपने आणले पेमेंट फीचर
- अर्णब गोस्वामींच्या समर्थनार्थ उपोषण करणाऱ्या राम कदमांना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात
- चिल, डोनाल्ड चिल ! म्हणत १६ वर्षीय ग्रेटा थनबर्गने ट्रम्प यांना मतमोजणी थांबवण्यावरून सुनावले…

