Share

पंकजा मुंडे यांच्या साखर कारख्यान्यात मोठी चोरी !

Published On: 

बीड: भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा बीड जिल्ह्यतील परळी तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना कधी दुर्घटना, तर कधी कामगारांचे पगार नेहमीच अशा काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. यावेळी पुन्हा मुंडेंचा हा कारख्ना चर्चेत आला आहे तो कारखान्याच्या वर्कशॉप आणि स्टोअरमध्ये झालेल्या मोठ्या चोरीमुळे

कारखान्याच्या वर्कशॉप आणि स्टोअरमधून तब्बल 37 लाख 84 हजार रुपयांचं साहित्य चोरी गेल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी 22 डिसेंबरला परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. या गोडाऊनमध्ये 17 ऑक्टोबर 2020 ला हि चोरी झाल्याच सांगण्यात येत आहे.

ही चोरी झाल्याची माहिती गोडाऊनचे स्टोअर किपर जी.टी. मुंडे यांच्याकडून कारखान्याचे लिपिक आणि लीगल इन्चार्ज जमीन शेख यांना कळवण्यात आली. त्यानंतर लिपिक आणि लीगल इन्चार्ज यांनी चोरीच्या ठिकाणाची पाहणी केली. त्यावेळी स्टोअर आणि वर्कशॉपच्या मागील बाजूचं शटर उचकटल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनतर ही माहिती पोलिसांन देण्यात आली आहे.

या चोरीमध्ये एकूण 37 लाख 84 हजार रुपयांचं साहित्य चोरट्यांनी लंपास केल आहे. त्यात कारखान्याचे संगणक, कपर मटेरियल, मिल बेअरिंग, बुश साऊंड बार अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा तपासाला सुरुवात केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!