अहमदनगर : जिल्ह्यातील के.के.रेंज व पीक विमा योजनेच्या प्रश्नांसंदर्भात मी व खा.डॉ.सुजय विखे एकत्र दिल्लीत गेलो. आम्ही एकाच पक्षात असल्याने एकत्र जाण्यात काही गैर नाहीच. विधानसभा निवडणुकीनंतर आमच्यात दुरावा आला होता हे खरे असले तरी सर्वच पक्षात अंतर्गत मतभेद, गैरसमज असतात. आमच्यातही काही तात्पुरते मतभेद झाले होते, पण आता ते मिटले असून आम्ही यापुढे एकत्रित काम करू, अशी प्रतिक्रिया माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिली आहे. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजित कार्यक्रमानंतर माजी मंत्री कर्डिले यांनी पत्रकारांशी बोलताना ही प्रतिकिया दिली.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विखे व कर्डिले यांच्यात दुरावा आल्याचे चित्र होते. कर्डीले यांनी त्यावेळी खा. विखे यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. अलीकडेच विखे व कर्डिले यांनी एकत्रित दिल्लीवारी केल्याने दोघांच्याही समर्थकांच्या भुवया उंचावल्या होत्या. काही दिवसांपूर्वी विळदघाट येथे खा.विखे यांनी उभारलेल्या कोव्हिड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगीही माजी आ.कर्डिले आवर्जून उपस्थित होते. त्यानंतर विखेंसोबत त्यांनी दिल्ली दौरा करून राहुरी,पारनेर आणि नगर तालुक्यातील के.के.रेंज प्रश्नाबाबत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली.
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नांची लवकरच सोडवणूक – समाजकल्याण आयुक्त प्रवीण दराडे
पीक विमा योजनेच्या रखडलेल्या पैशांसंदर्भात दोघांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचीही भेट घेतली. विधानसभा निवडणुकीनंतर विखे-कर्डीले यांचे सूत पुन्हा जुळल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
के.के.रेंजप्रश्नी शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही – प्राजक्त तनपुरे

