Share

मोठी बातमी : मी पडळकरांना फार महत्व देत नाही – शरद पवार

Published On: 

सातारा : शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे अशी जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

घर बसल्या पैसे कमवा… संध्याकाळनंतर पेट्रोल डिझेल विकत घ्या आणि सकाळी विका…

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे असं पडळकर म्हणाले आहेत.

‘मन की बात’ मध्ये पेट्रोल किमतींवर बोलण्याचे आवाहन जनतेने मोदींना करावे – काँग्रेस

संपूर्ण राज्यात याचे पडसाद उमटत असताना शरद पवार यांनी मात्र यावर मौन साधलं होत. मात्र पवारांनी आज साताऱ्यात यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘पडळकरांना लोकांनी बाजूल केलं आहे. त्यांच्यावर काय बोलायचं. मी पडळकर यांना फार महत्वह देत नाही. त्याचं बारामतीत डिपॉजिट जप्त झाल आणि सानाग्लीत सुद्धा ते पडलेत त्यांना महत्व देण्याची गरज नाही.’ असा टोला पवारांनी पडळकरांना लगावला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!