🕒 1 min read
औरंगाबाद : सिडकोतील प्रियदर्शिनी उद्यानात मनपाच्या वतीने उभारण्यात येणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम तूर्त ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे सोमवारी दिले. या उद्यानातील अनेक झाडे तोडून स्मारक उभारण्याची मनपाची योजना आहे. मात्र कोर्टाने याबाबत फटकारल्यानंतर मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी लगेचच प्रियदर्शिनी उद्यानाची पाहणी केली. आणि आज (दि.२५) औरंगाबाद पालिकेद्वारे याठिकाणी भारतीय वंशाच्या एकूण ३५० झाडांची लागवड करण्यात आली.
उद्या औरंगाबाद शहराचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे जेष्ठ नेते सुभाष देसाई शहरात येत आहेत. यावेळी ते प्रियदर्शिनी उद्यानात स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृतीवनाला भेट देऊन पाहणी करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवरच तर आज पांडेय यांनी वृक्षारोपण आयोजित केले नव्हते ना असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
प्रियदर्शिनी उद्यान सिडकोने २०१६ मध्ये महापालिकेकडे हस्तांतरित केले. मनपाने तेथे ठाकरे स्मारक उभारण्याची योजना तयार केली. मात्र शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या उद्यानातील झाडे तोडण्यास पर्यावरणप्रेमींनी विरोध केला होता. त्यानंतर या स्मारकाविरोधात मोठा लढा उभारला गेला. आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेनी झाडे न तोडता स्मारक उभारण्याचे वचन पर्यावरण प्रेमीना दिले.
स्मारकाचे काम तूर्त ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे नुकतेच दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त पांडेय यांनी याठिकाणी आज भारतीय वंशाच्या एकूण ३५० झाडांची लागवड केली. उद्या पालकमंत्री सुभाष देसाई याठिकाणी जवळपास १ तास पाहणी करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर तर आजचा कार्यक्रम आयोजित केला नव्हता ना अशी शंका आता व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
-
- शिवसेनेला मालमत्ता करमाफीच्या आश्वासनाचा विसर पडला; मुंबईकरांना मालमत्ता करात सूट मिळणार नाही ?
- मंत्री अब्दुल सत्तारांच्या गावातच कोरोना नियमांची ऐशीतैशी
- १० दिवसांतच अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळणार ; ‘या’ दिवशी मांडणार अर्थसंकल्प
- महाराष्ट्रात आरोग्यावर हवे अधिकचे काम, ७५ टक्के आमदारांचे मत
- इंधन दरवाढीचा निषेध करत इलेक्ट्रिक स्कूटीवरून प्रवास करणाऱ्या ‘या’ महिला नेत्याला तुम्ही ओळखलं का ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
