Share

पशुधन वाढविण्यासाठी नाविन्यपुर्ण योजना आखून पशुधनाचे संवर्धन करा- अमित देशमुख

Published On: 

लातूर:- जिल्हयातील पशुधन वाढविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने नाविन्यपुर्ण योजना आखून पशुधनाचे संवर्धन करावे तसेच जिल्हयात गोटफार्म, डेअरीफार्म व पोल्ट्रीफार्मचे मॉडेल तयार करण्याच्या सूचना राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या.

शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित पशुसवंर्धन , मत्सव्यवसाय व रेशीम शेती आढावा बैठकीत केले. या बैठकीस पशुधन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.शैलेश केंडे , डॉ. बि.यु. बोधनकर , डॉ. विनोद दुधाळे , डॉ. राजकुमार पडीले, जिल्हा रेशीम अधिकारी बागवे उपस्थित होते.

या बैठकीस मार्गदर्शन करताना पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की , जिल्हयातील पशुधन वाढविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने नाविन्यपुर्ण योजना आखून, जिल्हयात गोटफार्म, डेअरीफार्म व पोल्ट्रीफार्मचे मॉडेल तयार करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हयात पशुसंवर्धनाच्या विविध योजना राबवून शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय करण्यास चालना दयावी. तसेच सुशिक्षित बेकार युवकांसाठी हब तयार करावा व बचत गटांनाही प्रोत्साहन दयावे अशा यावेळी पालकमंत्री अमित देशमुख यांनी सूचना दिल्या.

या वर्षी पावसाचे आगमन वेळेवर झाले आहे, जिल्हयातील मत्स व्यवसाय विभागाने साठवण तलावातील पाणीसाठयामध्ये मत्स्यउत्पादकतेच्या तुलनेनुसार मत्स्यवाढीसाठी प्रयत्न करावे. तसेच मत्स्यवाढीसाठी स्वतंत्र असा प्रस्ताव शासनास सादर करावा असे निर्देश पालकमंत्री श्री. देशमुख यांनी दिले. जिल्हयात रेशीम उद्योगाला वाव असून रेशीम शेती उद्योगाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. रेशीम शेती वाढीचा संबंधीत विभागाने जाणीवपुर्वक प्रयत्न करावा.आपल्या काही अडीअडचणी बाबत ताबडतोबीने प्रस्ताव दाखल करावा असे त्यांनी सांगितले. या आयोजित बैठकीस पशुधन विभागाचे पशुधन विकास अधिकारी ,मत्सव्यवसाय विकास अधिकारी व रेशीम विकास अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!