Share

रत्नागिरी जिल्ह्यावर मोठे संकट, ‘सारी’च्या साथीने घातले थैमान

Published On: 

रत्नागिरी : देशात कोरोनाने हाहाकार माजवला असताना आता महाराष्ट्रात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात सारी नामक तापाच्या साथीने थैमान घातले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना पाठोपाठ आणखी एका आजाराचे संकट जिल्ह्यावर आले आहे.

भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ५८ टक्के – केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

यासंदर्भात आरोग्य यंत्रणेने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा रुग्णालय आणि शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पाठवलेल्या अहवालात सारी तापाने नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे कळवले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात आधारित आलेले 47 नागरिक दाखल झाले होते. 12 नागरिकांवर सध्या उपचार सुरु असून नऊ जणांचा सारी तापाने मृत्यू झाला आहे. एबीपी माझाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्या कमी होताना दिसत नाही आहे. देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. गेल्या २४ तासांत कोरोना रुग्ण संख्येत आतापर्यंतची सर्वाधिक वाढ नोंद झाली आहे. देशात पहिल्यांदाच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८ हजारांच्या पुढे गेली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५ लाख ८ हजार ९५३ वर पोहचली आहे.

दरम्यान, आतापर्यंत देशात एकूण मृतांची संख्या 15 हजार 685 वर पोहोचली आहे. कालअखेर देशात 79 लाख 96 हजार 707 चाचण्या झाल्या आहेत. काल (25 जून) देशात 2 लाख 20 हजार 479 चाचण्या झाल्या. तर एकूण 2 लाख 95 हजार 881 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 58.13 टक्के इतका आहे. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 1 लाख 97 हजार 337 इतके आहेत. गेल्या 24 तासांत 10 हजार 244 रुग्ण बरे झाले आहेत.

खळबळजनक : सोनिया गांधींच्या निकटवर्तीय नेत्याच्या घरावर EDचा छापा

महाराष्ट्रात काल 5 हजार 24 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. परवा 4 हजार 841 रुग्णांची नोंद झाली होती. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दीड लाखांच्या पार गेली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 1 लाख 52 हजार 765 वर पोहोचली आहे. यापैकी 79 हजार 815 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर 65 हजार 829 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!