Share

आदित्य एक सक्षम नेता, त्यांच्यामध्ये काम करण्याची जिद्द; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याने उधळले स्तुतिसुमने

Published On: 

अहमदनगर : ‘आदित्य ठाकरे हे चांगल्या पद्धतीने काम करतात. ते एक सक्षम नेता आहेत. एखादी व्यक्ती युवा असेल किंवा अनुभवी असेल त्याची काम करण्याची जिद्द असणे महत्वाचे आहे. आदित्य यांच्यामध्ये ही जिद्द असून त्यांच्या माध्यमातून नक्कीच चांगले काम केले जाईल,’ असे मत राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगतानाच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची पद्म पुरस्कार शिफारस समितीवर झालेल्या अध्यक्षपदी निवडीचे समर्थन केले.

दरम्यान, यावेळी सुशांतसिंह राजपूत प्रकरणाबाबत गायकवाड यांना विचारले असता, त्या म्हणाल्या ‘खरंतर मला तुम्ही शिक्षणाचे प्रश्न विचारायला पाहिजे, पण आता तुम्ही विचारताच आहात तर मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलँड पोलिसांसोबत होते, आणि त्याच मुंबई पोलिसांकडून याचा तपास चालू आहे, ते सत्यता बाहेर आणतील,’ असे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले.

दरवर्षी कॅबिनेटची एक बैठक रायगड घेण्याचे आदेश द्या, संभाजीराजेंची राज्यपालांकडे मागणी

आज औरंगाबाद येथून मुंबईला जात असताना गायकवाड या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी काही काळ नगरच्या शासकीय विश्रामगृहावर थांबल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला . याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, माजी शहर जिल्हाध्यक्ष दिप चव्हाण आदी उपस्थित होते. याप्रसंगी गायकवाड यांना आदित्य ठाकरे यांची पद्म पुरस्कार शिफारस समितीवर झालेल्या निवडीबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या , ‘आदित्य ठाकरे हे चांगल्या पद्धतीने काम करतात. ते सक्षम आहेत, आणि सक्षम आसणारी व्यक्ती ही चांगल्या पद्धतीने काम करत असते. मग ती व्यक्ती युवा असेल किंवा अनुभवी असेल , त्यामध्ये काम करण्याची जिद्द महत्त्वाची आहे, व ही जिद्द आदित्य ठाकरे यांच्यामध्ये दिसते.

लॉकडाऊन हटवण्याची कुठलीही घाई नाही – उद्धव ठाकरे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!