🕒 1 min read
मुंबई:- मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अद्याप वर्षभराचा अवधी आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे नियोजन भाजपाने सुरू केल्याचे वृत्त आल्यापासून या निवडणुकीचा विषय राजकीय वर्तुळात ऐरणीवर आला आहे. आता, भाजप पाठोपाठ काँग्रेसने देखील आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
राजकीय पक्षांनी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधील महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी कंबर कसल्याने राजकीय वातावरण देखील तापत आहे. अशातच काँग्रेसचे नेते व मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दोन महापालिका आयुक्तांच्या नेमणुकीची मागणी केली आहे.
पालिकेसाठी एकच आयुक्त असल्याने नागरिकांचे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहतात. शिवाय मुंबई उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना विविध प्रशासकीय कामांसंदर्भात छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पालिका मुख्यालयात यावे लागते. नागरिकांची होणारी ही गैरसोय पाहता मुंबई शहर व उपनगरासाठी दोन महापालिका आयुक्त असणं गरजेचं आहे, अशी मागणी अस्लम शेख यांनी केली आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेलत दोन महापालिका आयुक्त देण्याची काँग्रेसची मागणी शिवसेनेने धुडाकवून लावली आहे. मुंबई महापालिकेला दोन आयुक्त नकोच, एकच आयुक्त पुरेसा आहे, असं शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच यापूर्वीही मुंबईला दोन आयुक्त देण्याची मागणी झाली होती. त्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही ही संकल्पना आवडणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवू नका’
- धनंजय मुंडेंनी पक्षश्रेष्ठींना सादर केला एक वर्षाच्या कामकाजाचा आढावा
- आजारी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी रतन टाटा मुंबईहून पुण्यात पोहोचले, पण…
- औरंगाबादेत ‘मास्क’ न वापरणाऱ्यांनी भरला ’70’ लाखांचा दंड
- भंडारा घटनेतील सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेल्या बालकांमध्ये जुळ्यांचाही समावेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
