Share

भोसरीतील सुसंस्कृत राजकारणाचा बुरखा फाटला; प्राध्यापक, शिक्षकाकडून मतदारांना ‘धनलाभ’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : एका प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेचे प्राध्यापक आणि शिक्षक मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे वाटप करत असल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. १६) उघडकीस आली. त्यामुळे भोसरीच्या राजकारणातील कथित सुसंस्कृतपणाचा बुरखा फाटल्याची चर्चा सुरु झाली आहे.

भोसरी विधानसभा मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदानाला शेवटचे पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे काही उमेदवारांनी साम- दाम- दंड आणि भेद या नीतीचा वापर करून मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न करत आहेत. आरोप-प्रत्यारोप, अफवा आणि सोशल युद्ध सुरू असतानाच आता मतदारांना पैसे वाटप करतानाची घटना समोर आली.

याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रतिष्ठित कॉलेजचे प्राध्यापक आणि शिक्षक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित कॉलेज अपक्ष उमेदवार विलास लांडे यांच्याशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गुन्हा दाखल झालेले प्राध्यापक आणि शिक्षक लांडे यांच्या वतीने पैसे वाटप करीत होते का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

शाळेतील शिक्षक आणि शालेय कर्मचारी निवडणुकीच्या कामाला जुंपण्याची गोष्ट नवी नाही. मात्र, आता शिक्षकचं पैसे वाटपाचे काम देखील करताना दिसत आहेत. काही राजकीय मातब्बर नेत्यांनी शैक्षणिक संकुले उभारली आहेत. त्यामध्ये सर्वसामान्य मुलांना चांगले शिक्षण मिळावे अशी अपेक्षा आहे. सुसंस्कृत पिढी घडवण्याचे कार्य प्राध्यापक, शिक्षकांनी करावे, अशी नागरिकांची भावना आहे. मात्र, भोसरीतील उमेदवाराने शालेय संकुल राजकीय अड्डा बनवला आहे.

दरम्यान, शिक्षकाकडून पैसेवाटप प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी सुमारे सहा तास संबंधितांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवले होते. त्यांना मदत करण्यासाठी स्वतः उमेदवार विलास लांडे आणि त्यांचे चिरंजीव विक्रांत लांडे पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. तसेच, पिवळी पाटी असलेली एक कॅब आणि काही साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये एक डायरी मिळाली असून, त्यामध्ये शिक्षण संस्थेतील सुमारे ३५० कर्मचारी आणि शिक्षक यांना कोणती जबाबदारी दिली आहे. याचा उल्लेख आहे. या प्रकरणाचा एक व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1184437952497078273?s=20

 

https://twitter.com/Maha_Desha/status/1184440858013093889?s=20

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!