Share

कोरोनाबाधित डॉक्टरच्या संपर्कात आल्याने गरोदर महिलेने कुटुंबासहित स्वतः केले क्वारांटाईन

Published On: 

भिवंडी : कोरोनाची लागण कोठून कशी होईल सांगता येत नाही. त्यामुळे अनेकांना कोरोना झाल्याचं देखील लवकर समजत नाही. असे असतानाचं भिवंडीतील एका गरोदर महिलेने सजगता दाखवली आहे. तपासणी वेळी दवाखान्यात गेली असता डॉक्टरलाचं  कोरोना असल्याचे समजता तिने स्वतःला व आपल्या कुटुंबाला क्वारांटाईन करून घेतले आहे.

ही घटना भिवंडीतील जूचंद्र गावात घडली आहे. तपासणीसाठी सदर महिला दवाखान्यात आपल्या पती, जाऊ, मुलगी यांना घेवून गेली होती. त्या दवाखान्यात कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टर असल्याचे तिला समजताच तिने जागरूकता दाखवत गावात येऊन लगेच पोलीस पाटीलांना फोन लावून सर्व हकीकत सांगितली.

महिलेने दाखवलेल्या सजगतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तर या महिलेकडून इतरांनी शिकण्यासारखे आहे, असे स्थानिक प्रशासनाने सांगितले.  गरोदर महिला, पती,  जाऊ आणि मुलगी असे सर्व कुटुंबच भिवंडीतील आमंत्रण इथं क्वारन्टाइन झाले आहे. या घटनेमुळे भिवंडीतील गर्दी करणारे,  मोकाट फिरणारे आणि मॉर्निंग वॉक करणाऱ्यांनी आदर्श घेणे गरजेचं आहे. तसंच कोरोनाबाधितांच्या संर्पकात आलेल्या नागरिकांनी सुद्धा कोरोनाचा  धोका टाळण्यासाठी स्वतः क्वारन्टाइन व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान भिवंडी शहरात 3 आणि ग्रामीण भागात 3 असे कोरोनाचे सहा रुग्ण सापडल्याने आता ग्रामीण भागातील नागरिकांनी सुरक्षेचा उपाय म्हणून बाहेरील नागरिकांना प्रवेश देण्यास  मज्जाव केला आहे. या अनुषंगाने गावांचे मुख्य प्रवेशद्वार बांबू, काट्या व दगडांनी बंद केले जात आहेत.

‘या’ कायद्याचं पालन केलं नाही तर, कायद्यापलीकडे कोणालाही क्षमा केली जाणार नाही । Jitendra Awhad |

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!