🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : भीम आर्मीप्रमुख चंद्रशेखर आझाद यांनीही नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. बुधवारी चंद्रशेखर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या कायद्याने एससी / एसटी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.
भीम आर्मी चीफ या कायद्याचा सातत्याने विरोध करीत असून ते केंद्र सरकारला लक्ष्य करत आहेत. बुधवारी याच कायद्यावर दाखल झालेल्या 144 याचिकांची सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. चंद्रशेखर आझाद यापूर्वी जामा मशिदी येथे सीएएच्या विरोधात सहभागी झाले होते. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली होती.
नागरिकता संशोधन कायदा अर्थात सीएएच्या समर्थनात आज मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लखनौ येथे सभा घेतली. या सभेत त्यांनी हा कायदा कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नसल्याचे विरोधकांना खडसावून सांगितले. ‘भारता माता की जय’चा जयघोष करत शाह यांनी देशात सीसीए कायद्यावरून होणाऱ्या हिंसेला विरोधी पक्ष जबाबदारी असल्याचे सांगितले.
‘सीएए’च्या समर्थनार्थ लखनऊ येथे घेतलेल्या जाहीर सभेत शहा बोलत होते. यावेळी त्यांनी समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, काँग्रेस, तृणमूल काँग्रेसच्या यांच्यावरही शरसंधान केले. ‘सीएए’वरून होणाऱ्या हिंसाचाराला हे पक्षच जबाबदार आहेत असा आरोप त्यांनी केला.
https://www.youtube.com/watch?v=qnv6P6G9VBI
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
