Share

भावना गवळींना ईडीकडून दुसऱ्यांदा समन्स; चौकशीसाठी उद्या हजर राहण्याच्या सूचना

Published On: 

मुंबई : यवतमाळ-वाशिमच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी या गेल्या काही महिन्यांपासून सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आहेत. ईडीने त्यांना दुसऱ्यांदा समन्स बजावले आहे. बेलार्ड पियार्ड येथील कार्यालयात 20 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता हजर राहण्याची सूचना ईडीकडून गवळी यांना करण्यात आली आहे.

खासदारगवळी यांच्या वाशिममधील महिला प्रतिष्ठान ट्रस्टमधील कर्मचाऱ्याचे आणि त्यांचा निकटवर्तीय सईद खान यांनी केलेल्या रस्त्याच्या कामातील घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी 12 ऑक्टोबरला चौकशी केली होती. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार ट्रस्टच्या प्रमुख गवळी यांच्याकडे चौकशी केली जाईल. त्यांचा सहकारी सईद खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांच्याकडील चौकशीतून आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अनेक बाबी समोर आल्या आहेत.

त्याबाबत गवळी यांच्याकडे चौकशी करण्यात येणार आहे. ईडीने समन्स काढून 4 ऑक्टोबरला हजर राहण्याची सूचना केली होती. मात्र त्यांनी गैरहजर राहत 15 दिवसांचा अवधी मागून घेतला होता. त्यामुळे ईडीने ट्रस्टमधील गैरव्यवहार प्रकरणी अन्य पुरावे आणि जबाब मिळविण्यावर भर दिला आहे. महिला प्रतिष्ठान या ट्रस्टचे कंपनीमध्ये रूपांतर केल्याप्रकरणी तसेच शेल कंपन्यांद्वारे कोट्यवधीच्या देणग्या कंपनीच्या खात्यावर वर्ग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!