Share

Bhaskar Jadhav | समता पार्टीच्या ‘मशाल’ चिन्हावरील दाव्यानंतर भास्कर जाधवांनी सांगितली ठाकरे गटाची भूमिका,म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : निवडणूक आयोगाने पोट निवडणूकीसाठी उद्धव ठाकरे गटाला स्वतंत्र चिन्ह (मशाल) आणि नावं (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिल आहे. परंतू  1994 सालापासून मशाल हे आमच्या पक्षाचे चिन्ह आहे, असा दावा दिवंगत नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पार्टीने आयोगाने दिलेल्या ‘मशाल’ चिन्हावर केला आहे. त्यांच्या दाव्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणींमध्ये आणखिन वाढ झाली असून, सगळीकडे एकच चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे. याच पार्श्वभूमिवर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी समता पार्टीच्या दाव्यानंतर ठाकरे गटाची भूमिका सांगितली आहे.

काय म्हणाले भास्कर जाधव ?

आम्हाला ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह भारतीय निवडणूक आयोगाने दिले आहे. त्यामुळे समता पक्षाचा काही आक्षेप असेल, तर तो त्यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडेच नोंदवावा, असं भास्कर जाधव यांनी सांगितलं आहे.

भास्कर जाधव म्हणाले की, मशाल या निवडणूक चिन्हावर दावा सांगितला जात आहे. याबाबतची प्रत्यक्ष माहिती माझ्याकडे नाही. मात्र हे चिन्ह आम्ही स्व:त घेतलेले नाही. भारतीय निवडणूक आयोगाने हे चिन्ह आम्हाला दिले आहे. त्यामुळे त्यांना काही तक्रार, दावा, मागणी करायची असेल, तर ती भारतीय निवडणूक आयोगाकडे करावी. तसेच, आमच्या चिन्हाबद्दल जो आक्षेप घेतला जात आहे, त्याला आमची कायदेशीर बाजू सांभाळणारे शिवसेना पक्षाचे सचिव खासदार अनिल देसाई तसेच शिवसेनेचे नेते सुभाष देसाई भूमिका घेतील, असंही जाधवांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, 1994 सालापासून हे राष्ट्रीयकृत चिन्ह आमच्या पक्षाचं असल्याचा दावा पक्षाचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या तृणेश देवळेकर यांनी केला आहे. यासंदर्भात पक्षाने निवडणूक आयोगाला ईमेलच्या माध्यमातून माहिती कळवली असून हे चिन्ह आम्हाला देण्यात यावं अशी मागणी केली आहे. इतकेच नाही तर या चिन्हासाठी थेट न्यायालयामध्ये जाण्याचा इशाराही समता पार्टीने दिला असल्याचं समजतं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!