Share

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा ९१ वा वाढदिवस!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आपल्या मधुर आवाजाने जगभरात नावाजलेल्या, अनेक दशके गाजवणाऱ्या, आपल्या सुरेल आवाजाने अजरामर गीतांनी रसिकांना मोहवणाऱ्या, भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर म्हणजेच आपल्या लता दीदींचा आज ९१ व जन्मदिवस! आज त्या ९२ व्या वर्षात पदार्पण करत आहेत.

मूळच्या मराठी कुटुंबातल्या असलेल्या लता दीदींनी अनेक भाषेत गाणी गायली आहेत. २८ सप्टेंबर १९२९ साली त्यांचा मंगेशकर कुटुंबात जन्म झाला. मराठी संगीतातील प्रसिद्ध मास्टर दीनानाथ मंगेशकर हे त्यांचे वडील. लता दीदींनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, वीसहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले आहे.

लता दीदींच्या जन्मदिनानिमित्ताने अनेकांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीं पासून ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा सोशल माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी लता दीदींना फोनद्वारे संवाद साधून निरोगी व दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तर राज ठाकरेंनी,”जो आवाज दैवी आहे, ज्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही, संपूर्ण सूर काय असतो हे त्यांचा आवाज ऐकल्यावर कळत. आपल्या महाराष्ट्राचा जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलेला आणि ऐकलेला एकमेव आवाज, जो आवाज ऐकल्यावर तो अनादी आहे असं वाटत राहत आणि अनंत देखील. तो म्हणजे लतादीदींचा आवाज. आज दीदींचा जन्मदिवस. दीदी जन्मदिवसाच्या तुम्हाला मन:पूर्वक शुभेच्छा” अश्या शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!