Share

Bhima Koregaon Violence : भीमा-कोरेगाव दंगलीप्रकरणी राणा जेकबला अटक

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीप्रकरणी आज पोलिसांची धडक कारवाई सुरु असून राणा जेकब नावाच्या एका व्यक्तीला पुणे पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल च्या मदतीने अटक केली आहे. पटियाला कोर्टाने त्याची दोन दिवसांच्या ट्रांजिक्ट रिमांडवर रवानगी करण्यात आली आहे.

१ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीप्रकरणी सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे, यामध्ये ३१ डिसेंबरला शनिवार वाड्यावर आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेचे आयोजक आणि विद्रोही कार्यकर्ते सुधीर ढवळे यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

सुधीर ढवळे यांच्यासह वकील सुरेंद्र गडलिंग, माओवाद्यांचे नेते रोना विल्सन, शोभा सेन यांना नागपूर आणि दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. तर मुळचे गडचिरोलीचे असणारे महेश राऊत यांना देखील नागपूरमधून अटक करण्यात आली आहे.

भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील शनिवारवाडा येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोरेगाव भीमा येथे मोठी दंगल उसळली होती. एल्गार परिषदेमध्ये काही नक्षलवादी सहभागी झाले होते आणि हे नक्षलवादी सुधीर ढवळे यांच्या संपर्कात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

काय आहे भीमा-कोरेगाव प्रकरण?

पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव-भीमामध्ये ता.1 जानेवारी 2018 रोजी किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे पर्यवसान दगडफेक व जाळपोळीत झालं. सणसवाडीतील वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!