Share

खबरदार ! खाजगी दवाखाना बंद ठेवाल तर, सरकारने दिला थेट इशारा

Published On: 

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडॉऊन सुरु आहे. मुंबईसह उपनगरात लॉकडाऊनच्या काळात जे नर्सिंग होम आणि खासगी दवाखाने बंद आहेत, अशा दवाखान्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. तसेच बंद असणाऱ्या खासगी दवाखान्यांवर ‘एपिडेमिक ॲक्ट 1897’ (साथरोग कायदा 1897) नुसार कारवाई करण्याचे निर्देशही महापालिका आयुक्तांनी सार्वजनिक आरोग्य खात्याला दिले आहेत.

दरम्यान, कोरोना विषाणूव्यतिरिक्त अन्य आजारांवरील उपचारांसाठी सरकारनं खासगी नर्सिंग होम आणि दवाखाने सुरु ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, मुंबईत अनेक भागात अद्याप खासगी दवाखाने आणि नर्सिंग होम बंद आहेत. परिणामी इतर रुग्णांना मोठी गैरसोय होत आहे. आता असे खासगी दवाखाने आणि नर्सिंग होमवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. दवाखान्यांचे थेट परवानेच रद्द करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

महापालिकेच्या सर्व 24 विभागातील सार्वजनिक आरोग्य खात्याचे वैद्यकीय अधिकारी आपापल्या कार्यक्षेत्राचे सर्वेक्षण करतील. या सर्वेक्षणादरम्यान जे नर्सिंग होम बंद असल्याचे आढळून येतील, त्यांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल. त्याचप्रमाणे जे खासगी दवाखाने बंद आढळून येतील, त्यांच्याबाबत माहिती घेऊन संबंधित डॉक्टर किंवा दवाखाना उघडण्यात अडथळा आणणाऱ्यांवर ‘एपिडेमिक ॲक्ट 1897’ नुसार कारवाई करण्यात येणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!