धनश्री राऊत : आपण खूप लोकांना कपाळावर चंदन लावताना पाहतो. विशेषतः, भारतातील काही प्रांतांमध्ये सकाळच्या पूजेच्या वेळी कपाळाला चंदनाचा टिळा लावण्याचा प्रघात आहे. अनेक औषधी गुणांमुळे शरीरामध्ये उद्भविणारे अनेक लहान मोठे विकार बरे होण्यास मदत होते.
याचप्रमाणे चंदनाचा टिळा कपाळावर लावल्यास मन स्थिर होण्यास आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. थंड प्रवृत्त्तीचे चंदन शरीरात आणि कालांतराने मनाला शांतता मिळवण्यास मदत करते.
तसेच तिसरा डोळा हा शरीरात एकाग्रता वाढवण्याचे केंद्रस्थान आहे. चंदनाचा टिळा कपाळावर लावल्यास मन स्थिर होण्यास आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. थंड प्रवृत्त्तीचे चंदन शरीरात आणि कालांतराने मनाला शांतता मिळवण्यास मदत करते.
दरम्यान, चंदनामध्ये मंद सुवासाप्रमाणेच शरीरात थंडावा निर्माण करण्याची क्षमतादेखील आहे. यामुळे त्वचेच्या समस्या दूर होतात. सोबतीलाच नसांनादेखील थंडावा मिळतो. भारतासारख्या उष्णकटीबंधीय क्षेत्रात कपाळावर चंदन लावणे तुमच्या सार्या शरीराला थंड करण्यास मदत करते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

