Share

पिंपरी-चिंचवडमधील कोरोना संशयित महिलेचे रिपोर्ट्स निगेटिव्ह

Published On: 

🕒 1 min read

पिंपरी चिंचवड : ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारपासून पुणे शहर व जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा’ लागू केला. त्यामुळे आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास आणि आवश्यकता भासल्यास खासगी रुग्णालय, डॉक्टर आणि रुग्णालयातील यंत्रसामग्री अधिग्रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यात कोरोनाग्रस्त दांपत्य आणि त्यांच्या कुटुंब गेल्या दहा दिवसात ज्यांच्या संपर्कात आले त्या सर्वांच्या तपासण्या सुरु आहेत. यासाठी एक टीम काम करत आहे. पुण्यापाठोपाठ आता पिंपरी-चिंचवडमध्येही कोरोना व्हायरसची संशयित महिला नायडू रुग्णालयात दाखल झाली होती. संबंधित महिला 27 फेब्रुवारीला दुबईतून भारतात परतली होती. त्यानंतर कालपासून तिच्यात कोरोनाही लक्षणं आढळून आल्याने तातडीने खबरदारी म्हणून महिलेला पुण्याच्या नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, संबधित महिलेची तपासणी केली असता पिंपरी चिंचवडमधील कोरोना संशयित महिलेचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत. तरीही खबरदारी म्हणून तिला व तिच्या कुटुंबाला चार दिवस घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या महिलेसह तिच्या कुटुंबातील 8 व्यक्तींनाही नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. संबंधित महिला 21 फेब्रुवारीला दुबईत गेली होती. त्यानंतर भारतात परतल्यानंतर ती कुणाकुणाला भेटली याचीही माहिती आता घेतली जात आहे. याशिवाय नागपूरमध्ये देखील कोरोनाचा संशयित रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण देखील दुबईत जाऊन आल्याची माहिती समोर आली आहे. पुढील २४ तासात या रुग्णाचे रिपोर्ट येतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!