🕒 1 min read
मुंबई : कोरोना व्हायरसमुळे लावलेला लॉकडाऊन संपल्यावर घरी जायला मिळेल, या आशेने हजारो मजूर सकाळपासून मुंबईतल्या वांद्रे स्टेशनवर जमले होते.त्यामुळे या स्थलांतरितांची तारांबळ उडाली आहे. आपल्या गावी परत जाण्याची ओढ आणि कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव यात अडकलेल्या मजुरांना आता कसं इथून हटवावं, हा मोठा प्रश्न प्रशासनासमोर उभा झाला आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. ३ मे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतेही आस्थापना सुरु राहणार नाही. रेल्वेनेही ३ मे पर्यंत प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे अनेक ठिकाणी मजुरांचा आक्रोश पाहायला मिळत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थलांतरी कामगारांना महाराष्ट्रातच राहा असं आवाहन केलं आहे. तसेच सर्व सुविधा पुरवण्याचं आश्वासनही दिलं आहे. आपण भारताचे नागरिक आहात आणि आपण आता आहात तिथेच थांबावं असं त्यांनी आव्हान केलं आहे. तसेच बाहेर राज्यातील मराठी नागरिकांनी आहेत तिथेच थांबावे असेही ठाकरे म्हणाले.
तर दुसरीकडे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील ट्रेन चालू होण्याची अफवा पसरवणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ‘ट्रेन चालू होणार या प्रकारची अफवा ज्यांनी पसरविली त्याबद्दलचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहे, तसेच चौकशी करून अफवा पसरविणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल.’ असा सज्जड दमच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.
ट्रेन चालू होणार या प्रकारची अफवा ज्यांनी पसरविली त्याबद्दलचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहे, तसेच चौकशी करून अफवा पसरविणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 14, 2020
दरम्यान, आता पोलिसांनी याचा तपास केला असता ते उत्तर भारतीय महापंचायतचा अध्यक्ष विनय दुबे पर्यंत पोहोचले. जमावाला भडकवल्याप्रकरणी दुबे याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.
वांद्रे येथे गर्दी जमावल्याप्रकरणी विनय दुबे ला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याने फेसबुक लाईव्ह करत उत्तर भारतीयांसाठी मजदूर आंदोलनाची हाक दिली होती. परप्रांतीयांना आपापल्या राज्यात पाठविण्यासाठी पायी जाणार असल्याचे त्याने म्हटले होते. यासाठी प्रत्येकाची माहिती व्हॉट्सएपवर पाठवण्याचे आवाहन देखील त्याने केले होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
