Share

तळीराम नाराज ! उस्मानाबाद जिल्हयात मद्यविक्रीचा निर्णय मागे

Published On: 

तुळजापूर – कोरोनामुक्त असलेल्या उस्मानाबादजिल्ह्यात दारू विक्रीचा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे तळीरामांवर पुन्हा एकदा मोठे संकट आले आहे. नागरिक दारू खरेदी करताना नियमांचे पालन करत नसल्याने हा नर्णय घेण्यात आला आहे.

उस्मानाबाद जिल्हयात सोमवार, बुधवार आणि शुक्रवार यातीन दिवशी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेतच  दारू विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्यात शहरी भागात दारुच्या दुकांनांन समोर लागलेल्या मद्यप्रेमींंच्या लांबच लांब रांगा आणि सोशल डिसंटन्स पाळला जाण्याची शक्यता कमी असल्याने कोरोनामुक्त जिल्हा अबाधित राहावा यासाठी दारुविक्रीचा आदेश मागे घेण्यात आला आहे.

यामुळे जिल्हयातील मद्यप्रेमींंनी नाराजी व्यक्त केली असून यामुळे ज्यादा दराने व बनावट दारु विक्रीत वाढ होईल अशी प्रतिक्रिया येत आहे. तुळजापूर शहरात तर दारु विक्री करणाऱ्या दुकानदारांनी दुकांनासमोर दारु विक्री साठी लाकडी बँरेकेटींग उभारले होते. तर शहरात दोन दारु विक्री चार देशी दारु विक्री व दहा बियर बार असून हे आता पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत.

दरम्यान राज्यात इतर ठिकाणी दारूची दुकान उघडली आहेत. मात्र गिऱ्हाईक दारू विकत घेण्यासाठी लांबच लांब रांगा लावत आहेत. या लावलेल्या रागांमध्ये सोशल डिसंटन्स पाळला जात नसल्याने पोलिसांना काही ठिकाणी कठोर कारवाई लागत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!