Share

‘बाळासाहेबांच्या नावाला विरोध नाही पण दि. बा. पाटील यांचे कार्य मोठे’ – आशिष शेलार

Published On: 

मुंबई : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव द्यावे या मागणीने जोर पकडला आहे. रिपाईसोबतच अनेक समाजिक संघटना ही मागणी करताना दिसून येत आहेत. लोकनेते दि. बा.पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यासाठी यापूर्वी राज्य आणि केंद्र सरकारकडे विनंती करण्यात आलेली आहे. तरी देखील अचानकपणे 17 एप्रिल रोजी सिडकोच्या संचालक मंडळाने लोकभावनेचा विचार न करता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

नवी मुंबई विनानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याची मागणी स्थानिक भूमिपुत्रांनी केली आहे. त्यावर या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे. यावरून आता राजकारण चांगलेच तापायला सुरु झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी भाष्य केले आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला आमचा विरोध नाही. आघाडी सरकारने याबाबत सर्व समावेशक निर्णय घेतला पाहिजे. दि. बा. पाटील यांचे कार्यही मोठे आहे. ज्या ठिकाणी दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी सुरू आहे. त्याला आमचा विरोध नाही, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. दरम्यान, नवी मुंबईतील या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा हा निर्णय झाल्यानंतर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी, कष्टकरी ओबीसी जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यासाठी आपले आयुष्य वाहून घेणाऱ्या या लोकनेत्याचे नाव विमानतळाला द्यावे यासाठी सारे प्रकल्पग्रस्त तसेच सामाजिक व राजकीय संघटना मानवी साखळी आंदोलन केले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!