Share

कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे

Published On: 

पुणे: महाराष्ट्र्रात कोरोना बधितांची संख्या 97 वर पोहचली आहे.राज्यात नव्याने ८ रुग्ण आढळले असून यामध्ये मुंबईत ३, सांगलीत ४ तर साताऱ्यात एक रुग्ण आढळला आहे, आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी जनतेशी संवाद साधताना राज्यात आजपासून संचारबंदी लागू करण्यात आल्याची घोषणा केली.

या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीदेखील जनतेला सुरक्षिततेचे आवाहन केले आहे.
‘कोरोना या आजाराने संपूर्ण जगासह महाराष्ट्रावर मोठे संकट आले असून याचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यामध्ये जनतेचे संपूर्ण सहकार्य गरजेचे असून करोनाच्या या संकट काळात नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे,’असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ते म्हणत आहेत की,
” या आजाराने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाचे संकट हे संपूर्ण जगासह देशावरील व महाराष्ट्रावरील मोठे संकट आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखणे अत्यंत गरजेचे असून यासाठी राज्य सरकारने अनेक प्रभावी उपाययोजना केल्या आहेत. सरकारचे सर्व विभाग करोना रोखण्यासाठी अत्यंत चांगले काम करत आहेत. ”

मात्र अद्यापही अनेकजण या संकटाला गांभीर्याने पाहत नाहीत, हे चिंताजनक आहे. प्रत्येक नागरिकाने स्वत:ची काळजी घ्यावी तसेच घराबाहेर पडणे टाळावे. याच बरोबर आपल्या कुटुंबीयांची व समाजाची काळजी घ्यावी. सर्वांनी गर्दीत जाणे टाळावे त्याचप्रमाणे स्वत:ची काळजी घेत घराबाहेर न पडता करोनाच्या लढाईत नागरिकांनी सरकारला संपूर्ण साथ द्यावी, असे आवाहनही थोरात यांनी केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!