मुंबई : राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये कोणताही संवाद नाही. काहीही ताळमेळ नाही, त्यामुळे हे सरकार फार काळ टीकेल असं वाटत नाही, असं भाकीत मनसेचे राज ठाकरे यांनी वर्तवलं आहे. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीन पक्षाचं सरकार आलं होतं. तेव्हाच मी सांगितलं होतं, हे सरकार फार काळ टिकणार नाही. आताही या तीन पक्षांमधील सावळागोंधळ पाहता हे सरकार फार काळ टिकणार नाही असं वाटतं. या सरकारमधील तिन्ही पक्षाचा एकमेकांशी संवाद नाही. ताळमेळ नाही. त्यामुळे हे सरकार लवकर जाईल, असं वाटतं, असं राज ठाकरे म्हणाले. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाकीत वर्तवलं होत.
त्यावर आता राज्याचे महसूलमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी राज ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “महाविकास आघाडी सरकार टिकणार आणि आपला पाच वर्ष कार्यकाळ पूर्ण करणार” असा दावा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. “सरकार जास्त काळ टिकणार नाही, अशी भविष्यवाणी हे कशाच्या आधारे करतात, हेच मला समजत नाही” असा टोला थोरातांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला.
‘सर्वात पहिले आणि सर्वात मोठ्या प्रमाणावर लस तयार करणार’, आदर पूनावालांचा मोठा दावा
“हे भविष्यवाणी कशावर आणि कशाच्या आधारे करतात हे मला काही समजलेलं नाही. फार कमी कालखंड आम्हाला मिळाला आहे. त्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही आघाडी सरकारचं काम पाहिलं, तर ते निश्चितच चांगलं आहे. कामांची यादी पाहिली तर खूप मोठी आहे आणि किमान समान कार्यक्रम आम्ही राबवत आहोत” असे थोरात म्हणाले. “मला माहिती नाही ते सरकार टिकणार नाही हे कशाच्या आधारावर म्हणत आहेत, पण मी सांगतो हे सरकार टिकणार आणि आपला पाच वर्ष कार्यकाळ पूर्ण करणार आणि 100% चांगलं काम करणार” असा विश्वासही बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
‘त्यांना दुध आणि लोण्यातील फरक तरी कळतो का’ ? ओमराजेंचा राणा पाटलांना जोरदार टोला


