🕒 1 min read
बीड : कोरोनाने देशभरात हाहाकार माजवला आहे. राज्यात देखील कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. मात्र यासगळ्यात उसतोड कामगारांचे अतोनात हाल होत असल्याची भयानक चित्र समोर आलं आहे.
विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्याचा पाऊस काही ठिकाणी सुरू झालेला आहे.त्यामुळे अनेक ऊस तोडणी मजुरांचे हाल होत आहेत. अनेकांच्या या वादळामध्ये झोपड्या पडलेल्या आहेत. त्यांना दिलेले धान्य पूर्णपणे भिजून गेलेले आहे.आणि आशा कठीण परिस्थिती मध्ये ऊस तोडणी मजूर याठिकाणी जगत आहेत. अशात उसतोड कामगारांची व्यवस्था करण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशी भावना आता जनमानसातून येत आहे.
दरम्यान, याच मुद्द्यावरून जय भगवान महासंघाचे अध्यक्ष आणि उसतोड कामगारांचे नेते बाळासाहेब सानप यांनी साखर सम्राट आणि सरकारवर तुफान हल्ला चढवला आहे. ऊसतोड कामगारांची अवस्था खूप खालावली आहे. येत्या दोन-चार दिवसांत ते आपापल्या घरी नाही आले तर आत्महत्या सुरु होतील अशा शब्दांत सानप यांनी उसतोड कामगारांची व्यथा मांडली आहे. अशा वेळी जर कारखानदार जर उसतोड कामगारांना सांभाळत नसेल तर कारखानदारांच्या मतलबासाठी कामगारांनी त्यांना का म्हणून सांभाळावे असा सवाल देखील सानप यांनी उपस्थित केला आहे. अजून ४ महिन्याने सीजन आहे तेव्हा या आमच्याकडे तुम्हाला बांधूनच ठेवतो असा जोरदार घणाघात बाळासाहेब सानप यांनी कारखानदारांवर केला आहे.
तर , माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते यांनी देखील सरकावर जोरदार हल्ला चढवला आहे. सरकारने या लोकांना अन्न धान्य दिले पाहिजे आहे तिथ जर व्यवस्था करायची असेल तर व्यवस्थित करायला हवी. या लोकांच्या जनावरांना चार मिळत नाही बर्याच कारखानदारांनी या लोकाची जबाबदारी झटकली आहे. या लोकांच्या पिण्याच्या पाण्यासासून समस्या आहेत. तेव्हा सरकारने स्थानिक प्रशासनाला या लोकांच्या समस्या सोडवायला सांगितल पाहिजे. पण सरकारला उसतोड कामगारांबद्दल संवेदना आहेतच की नाही असा उद्विग्न सवाल माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते यांनी विचारला आहे. तर सरकारमधील मंत्री असलेले धनंजय मुंडे यांनी या प्रश्नावर लवकर तोडगा काढणार असल्याच सांगितल होत पण त्यांनी काहीच केलं नाही अस म्हणत सातपुते यांनी धनंजय मुंडे यांच्यावर देखील घणाघात केला आहे.
दुसरीकडे माजी मंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी देखील सरकारने या कामगारांची सोय लवकरात लवकर करावी अशी मागणी केली आहे. आशा कठीण परिस्थिती मध्ये ऊस तोडणी मजूर याठिकाणी जगत आहेत.मी या राज्याच्या माजी मंत्री आदरणीय पंकजाताई मुंढे यांच्याशी आत्ताच थोड्या वेळापूर्वी फोनवर बोललो त्यांनी सांगितले की मीही सर्व पातळीवरती प्रयत्न करत आहे जेणेकरून या मजुरांना कसे त्यांच्या त्यांच्या जागेवरती पोहच करता येईल. अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.
तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना सदाभाऊ खोत यांनी देखील विनंती केली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवरती विशेषतः ऊस पट्यामध्ये ऊस तोडणी मजुरांचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे.पश्चिम महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्याचा पाऊस काही ठिकाणी सुरू झालेला आहे.त्यामुळे अनेक ऊस तोडणी मजुरांचे हाल होत आहेत.अनेकांच्या या वादळामध्ये झोपड्या पडलेल्या आहेत.त्यांना दिलेले धान्य पूर्णपणे भिजून गेलेले आहे. अशात त्यांची कारखान्याच्या माध्यमातून व सरकारच्या माध्यमातून योग्यती व्यवस्था व सोय करण्यात अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
तर तिकडे राज्याच्या माजी ग्रामविकासमंत्री आणि उसतोड कामगारांच्या नेत्या पंकजा मुंडे या देखील याविषयी आक्रमक झाल्या असून इथे लेकरांच्या जेवणात चिखल, कुडं पडली, धान्य भिजलय, आज अन्न गेलं नाही गळ्याखाली! बिचारे मजूर आयसोलेशनने आजारी पडतील. सर्व शिस्त पाळून, कष्ट करुन त्यांच्या ताटात माती? ते हॉट स्पॉटमध्ये नाहीत, न हॉट स्पॉटला जाणार आहेत. मग काय प्रॉब्लेम? उद्याच्या उद्या जाहीर करा निर्णय बस्स!!’ अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.
त्यामुळे सरकार, ऊसतोड कामगारांची ही पंचतारांकीत सोय बस्स करा. अवकाळी पावसानं त्यांच्या आयुष्याचा चिखल झालाय. चिल्यापिल्यांनी कशी रात्र काढली असेल? पावसानं अन्नात माती कालवलीय. चिखलात रूतलेल्यांना बाहेर काढा. माणसं आहेत ती. वेळीच दखल घेतली नाही तर ऊसाच्या फडाचा मसनवाटा होईल मसनवाटा. असा आक्रोश आता उसतोड कामगार करत आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

